ODI Ranking : ऑस्ट्रेलियाने एकाच दगडात मारले दोन पक्षी; आधी जिंकली वनडे सीरिज, आता दिला ४४० व्होल्टचा झटका

India vs Australia ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. ही जखम ताजी असतानाच, टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे.
India vs Australia 3rd ODI
India vs Australia 3rd ODI Saam TV

India vs Australia ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. या पराभवासह टीम इंडियाने वनडे मालिका १-२ अशा फरकाने गमावली. ही जखम ताजी असतानाच, टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कारण, गेल्या काही दिवसांत जे कमावलं ते गमावण्याची वेळ भारतावर आली आहे. (Latest Sports News)

India vs Australia 3rd ODI
IND vs AUS : कसोटीत कमावलं पण वनडेत गमावलं, टीम इंडियाच्या पराभवाची ५ मोठी कारणे

दोन्ही संघासाठी करो या मरो, अशा सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australiaप्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सावध सुरूवात केली. सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेट्साठी ६८ धावांची भागीदारी केली. भारताला पहिली विकेट ११ व्या षटकामध्ये मिळाली.

हार्दिकने टीम इंडियाला झटपट ३ विकेट्स मिळून दिल्या. इतकंच नाही, तर हार्दिकने स्टीव्हन स्मिथ याचा शून्यावर काटा काढून दुसऱ्या वनडेतील बदलाही घेतला. हार्दिकनंतर कुलदीप यादवने कांगारूंच्या मधल्या फळाला एकट्याने सुरूंग लावला. डेव्हिड वॉर्नर २३ धावा, मार्नस लॅबुशेन २८ आणि अॅलेक्स कॅरी ३८ धावा यांना कुलदीपने बाद केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला टीम इंडिया (Team India) पुढे विजयासाठी २७० धावाच करता आल्या.

त्यानंतर मैदानात २७० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. अॅडम झॅम्पाच्या फिरकीपुढं भारतीय फलंदाज ढेर झाले. झॅम्पाने ४ तर एगरने २ विकेट घेत भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे भारताचा डाव गडगडला आणि ४९. १ षटकात २४८ धावांवर भारताचा आख्खा संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून तिसऱ्या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.

दरम्यान, सलग दोन पराभवानंतर टीम इंडियाने मायदेशातील वनडे मालिका गमावली. ही जखम ताजी असतानाच, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का दिला. त्यांनी एकदिवसीय रँकिगमध्ये टीम इंडियाकडे असलेलं अव्वल स्थान हिरावून घेतलं. हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ हा आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.

मात्र, पराभवामुळे आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आता भारताकडून हे अव्वल स्थान ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाच्या संघाचे या क्रमवारीत ११३ गुण झाले आहेत. या क्रमवारीत भारताचेही ११३ गुण झाले आहेत. पण ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा कमी सामने खेळले आहेत आणि त्याचा फायदा त्यांना झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ३५ सामन्यांमध्ये ११३ गुण पटकावले आहे आणि हेच ११३ गुण कमावण्यासाठी भारताला ४७ सामने खेळावे लागले आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com