Shreyas Iyer : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यर खेळणार? फिटनेसबाबत आली महत्त्वाची अपडेट

Ind Vs Aus Test: पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
Shreyas Iyer Fitness Update
Shreyas Iyer Fitness Update Saam TV

Border Gavaskar Trophy : नागपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करत टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला दमदार सुरूवात केली. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीत शुक्रवारपासून (१७ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे श्रेयस दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. (Latest Marathi News)

अशातच श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडलेला श्रेयस अय्यर अजूनही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे निवड समिती त्याला दुसऱ्या कसोटीत खेळवून धोका पत्कारणार नाही. तिसऱ्या कसोटीत मात्र, त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Shreyas Iyer Fitness Update
Hardik Pandya White Wedding: हार्दिक पंड्या पुन्हा लग्न करणार; या प्रसिद्ध ठिकाणी करणार व्हाईट वेडिंग

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा टीम इंडियातील मधल्या फळीचा महत्वाचा फलंदाज आहे. त्याच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात मधल्या फळीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नागपुरातील सामन्यावर भारताची पकड असताना, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, आणि के.एस भरत झटपट माघारी परतले होते. (Latest Sports Update)

श्रेयसच्या जागी संधी मिळालेल्या सूर्यकुमारला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. दरम्यान, श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित झाल्याने सूर्यकुमार यादवला आणखी एका सामन्यासाठी टीम इंडियात संधी मिळणार आहे. या सामन्यात तो कशी कामगिरी करणार याकडे निवड समितीची नजर असेल.

दरम्यान, अय्यरने बेंगळुरूमधील एनसीएमध्ये ट्रेनिंग घेतानाचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अय्यर एनसीएमध्ये स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगचे प्रशिक्षण घेत आहे, परंतु राष्ट्रीय संघासह आंतरराष्ट्रीय स्तरावर परतण्यासाठी त्याला किमान एक देशांतर्गत सामना खेळणे आवश्यक आहे. त्यामुळेच अय्यरला थेट कसोटी सामन्यात खेळण्यासाठी उतरवता येणार नाही कारण यामध्ये त्याला ९० षटके क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि त्याला बराच वेळ फलंदाजी करावी लागू शकते.

Shreyas Iyer Fitness Update
IND VS AUS :बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या वेळापत्रकात महत्वाचा बदल! धर्मशाळा नव्हे तर 'या' मैदानावर रंगणार तिसरा कसोटी सामना

श्रेयस अय्यर इराणी चषक खेळणार?

चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती १ ते ५ मार्च दरम्यान मध्य प्रदेश विरुद्ध इराणी चषक सामन्यात फिटनेस दाखवण्यासाठी अय्यरचा उर्वरित भारतीय संघात समावेश करू शकण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी निवड समितीने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला फिटनेस दाखवण्यासाठी रणजी सामना खेळण्यास सांगितले होते.

पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेला जडेजा शुक्रवारी दिल्लीत सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वैकल्पिक प्रशिक्षण सत्रासाठी जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर नेटमध्ये सराव करताना दिसला. जडेजासोबत सिनियर फलंदाज चेतेश्वर पुजाराही होता. पुजारा फिरोजशाह कोटला येथे आपला १०० वा कसोटी सामना खेळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com