IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना क्राइस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्यांत न्यूझीलंड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.
IND vs NZ 3rd ODI
IND vs NZ 3rd ODISaam TV

IND vs NZ 3rd ODI Latest Updates : भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना क्राइस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्यांत न्यूझीलंड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. भारतीय संघासाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. कारण, पहिल्या सामन्यांत विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झालेला आहे. (Latest Marathi News)

IND vs NZ 3rd ODI
Rohit Sharma - Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहलीला टी २० मधून मिळणार डच्चू? BCCI चा प्लान समोर?

तिसरा एकदिवस सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. तर, दुसरीकडं अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंड संघाचा मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. या दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सलामीवर फलंदाज शिखर धवनकडे खांद्यावर आहे. (Sports News)

संघाला पराभवापासून वाचवण्याचं आव्हान धवनसमोर आहे. टीमचे हेड कोच व्ही.व्ही.एस लक्ष्मण सुद्धा मालिका पराभव टाळण्याचा प्रयत्न करतील. पाऊस आला, तर मॅच रद्द होईल. अशा स्थितीत एक सामना जिंकल्यामुळे न्यूझीलंडची टीम मालिका विजेती ठरेल. भारतासाठी (Team India) ही चांगली बातमी नसेल.

भारताची प्लेईंग इलेव्हन

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन

फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com