Rahul Tripathi : अर्धशतक हुकलं पण मनं जिंकली; त्रिपाठीचा षटकार पाहून सूर्यकुमारलाही विसराल!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे.
Rahul Tripathi Latest
Rahul Tripathi LatestSaam TV

IND vs NZ 3rd T20 Match Live Updates : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर इशान किशन स्वस्तात माघारी परतल्यानंतर परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेला राहुल त्रिपाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्रिपाठीने एकापेक्षा एक सुंदर फटके खेळले. (IND vs NZ 3rd T20)

Rahul Tripathi Latest
IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर!

त्याने २२ चेंडूत ४४ धावांची सुंदर खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ जबरदस्त षटकारांचा समावेश होता. ४४ धावांवर असताना, सोढीला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. दरम्यान, त्रिपाठीचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने चाहत्यांची चांगलीच मने जिंकली. यादरम्यान, त्याने एक असा षटकार मारला की जो पाहून क्रिकेटप्रेमींना सूर्यकुमार यादवची आठवण झाली.

डावाच्या दुसऱ्या षटकात इशान किशन माघारी परतल्यानंतर त्रिपाठीने युवा फलंदाज शुभमन गिलच्या साथीने टीम इंडियाला  (Team India) दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट्साठी ८६ धावांची भागीदारी केली. एकीकडे त्रिपाठीची फटकेबाजी सुरू असताना दुसरीकडे शुभमन गिलने सुद्धा आपला फॉर्म दाखवला.

पहिल्या दोन टी-२० सामन्यात स्वस्तात बाद होणाऱ्या शुभमनने न्यूझीलंडच्या गोलदाजांना एकदिवसीय मालिकेची आठवण करून दिली. शुभमनने एकापेक्षा एक अप्रतिम फटके लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा टीम इंडियाच्या १४ षटकांत ३ बाद १४४ धावा केल्या होत्या. शुभमन गिल ४४ चेंडूत नाबाद ६७ धावांवर खेळत होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे पहिल्या सामन्यांत झालेल्या दारूण पराभवानंतर दुसऱ्या सामन्यांत टीम इंडियाने फिरकी गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव केला होता. त्यामुळे तीन सामन्याची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. आता तिसरा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेवर कब्जा करेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com