Shubman Gill On Fire: 4, 4, 4, 6, 4 शुभमन गिलने एकाच ओव्हरमध्ये कुटल्या इतक्या धावा; रोहित फक्त बघतच राहिला!

टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
IND vs NZ 3rd ODI, Shubman Gill a Century
IND vs NZ 3rd ODI, Shubman Gill a CenturySaam TV

इंदोर : टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. गिलने आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे. वनडेत आपले स्थान पक्के करणाऱ्या या युवा फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यांत द्विशतक झळकावले. दुसऱ्या सामन्यांत नाबाद ४० धावा केल्यानंतर आता तिसऱ्या सामन्यातही गिलने दमदार शतक झळकावलं आहे.

IND vs NZ 3rd ODI, Shubman Gill a Century
IND vs NZ 3rd ODI : रोहित-गिलने न्यूझीलंडला धुतलं; दोघांनाही झळकावली शतकं; भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामना इंदोरमधील होळकर मैदानावर खेळवला जात आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यांत न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय न्यूझीलंडच्या चांगलाच अंगलट आला. कारण, कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवर शुभमन गिलने टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली.

पहिल्या दोन सामन्यांत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलकडून या सामन्यातही चांगल्या खेळीची क्रिकेटप्रेमींना आशा होती. शुभमनने डावाच्या सुरूवातीला सावध खेळी केली. मात्र, आठव्या षटकांत तो न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. आठव्या षटकात गिलने लॉकी फर्ग्युसनला एक दोन नव्हे तर सलग ४ चौकार लगावले. यादरम्यान, त्याने एक षटकारही लगावला. या ओव्हरमध्ये गिलने २२ धावा वसूल केल्या.

IND vs NZ 3rd ODI, Shubman Gill a Century
INDvsNZ 3rd ODI : टीम इंडिया इंदूरमधील मैदानावर अजिंक्य, पाहा रेकॉर्ड्स; सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येईल?

शुभमन गिलने ७८ चेंडूत ११२ धावांची विस्फोटक खेळी केली. आपल्या धडाकेबाज खेळीत त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांचा पाऊस पाडला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. गेल्या तीन सामन्यांत गिलचे हे दुसरे शतक आहे. पहिल्या सामन्यांत त्याने २०८ धावांची विस्फोटक खेळी केली होती. शुभमन ११२ धावांवर बाद झाला.

दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने सुद्धा या सामन्यांत आपला फॉर्म दाखवला. रोहितने ८३ चेंडूत १०१ धावा कुटल्या. या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकार लगावले. आपल्या शतकानंतर रोहित शर्मा बाद झाला. दरम्यान, रोहित आणि शुभमनच्या सुरेख खेळीमुळे तिसऱ्या वनडे सामन्यांत भारताने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा टीम इंडियाच्या ४० षटकांत ५ बाद २९४ धावा झाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com