IND vs WI: टीम इंडियाची घोषणा होताच दिग्गज खेळाडूच्या कारकिर्दीला लागला फुल स्टॉप; लवकरच निवृत्ती घोषित करणार?

Cheteshwar Pujara: भारतीय संघात असा एक खेळाडू आहे जो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.
team india
team indiasaam tv

Indian Team for West Indies Series: भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी( २३ जून) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. ३ ऑगस्टपासून या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

या मालिकेसाठी रोहित शर्माची कर्णधार तर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान एक खेळाडू असा देखील आहे जो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.

team india
Team India Squad Announced: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मराठमोळ्या रहाणेला मिळाली मोठी जबाबदारी

रोहितला कर्णधारपद तर रहाणेला उपकर्णधारपद ..

वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. असे म्हटले जाते होते की, रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र असं काहीच झालं नाही.

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धेतील ही पहिलीच मालिका असणार आहे. त्या दृष्टिकोनाने रोहितला विश्रांती न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अंजिक्य रहाणेला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

पुजाराची कारकिर्द संपली?

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

या सामन्यात तो फ[पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याला दोन्ही डावात मिळून अवघ्या ४१ धावा करता आल्या होत्या. आता संघाबाहेर केल्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात आहे की, चेतेश्वर पुजारा लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो. (Latest sports updates)

team india
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com