
PBKS vs DC Match Updates: रायली रूसोच्या ३७ चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी त्याला पृथ्वी शॉने दिलेली चांगली साथ आणि शेवटच्या षटकात फिल्प सॉल्टने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करतान पंजाब किंग्जसमोर विजयासाठी २१४ धावांचं लक्ष ठेवलं आहे. धर्मशाला मैदानावर पंजाबने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, दिल्लीच्या फलंदाजांनी शिखर धवनचा हा निर्णय चुकीचा ठरवला. (Latest sports updates)
दिल्लीच्या सलामी फलंदाजांनी सुरूवातीपासूनच आक्रमक (Cricket News) खेळी केली. संघात पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाटी ६२ चेंडूत ९४ धावांची भागिदारी केली.
पृथ्वी शॉने सुरुवातीला संयम दाखवला. तर दुसरीकडे डेविड वॉर्नरने धावांचा (Sport Updates) पाऊस पाडला. वॉर्नरने ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि ५ चौकार लगावले. सॅम करनने त्याला बाद करत ही जोडी फोडली.
वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेल्या रिली रूसोने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सलामीवीर पृथ्वी शॉने आपले हंगामातील अर्धशतक पूर्ण केले. मात्र सॅम करनने त्याला धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. पृथ्वी शॉने ३८ चेंडूत ५४ धावा कुटल्या. दरम्यान, या धक्क्याचा रूसोवर काही परिणाम झाला नाही.
त्याने आपला दांडपट्टा सुरूच ठेवत २५ चेंडूत अर्धशतक ठोकले. हे त्याचे हंगामातील पहिले अर्धशतक ठरले. यानंतरही रूसो थांबला नाही त्याने ३७ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी करत दिल्लीला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. त्याला सॉल्टने १४ चेंडूत २६ धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून सॅम करनने दोन विकेट्स घेतल्या.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.