GT vs DC Match Result: इशांत शर्माने गुजरातच्या तोंडचा घास पळवला; थरारक सामन्यात दिल्लीचा विजय

Gujarat Titans vs Delhi Capitals Match Result: शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ५ धावांनी पराभव केला.
Gujarat Titans vs Delhi Capitals Match Result
Gujarat Titans vs Delhi Capitals Match ResultSaam TV

Gujarat Titans vs Delhi Capitals Match Result: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात झाला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी १३१ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात धावाच १२६ करू शकला. इशांत शर्मा दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १२ धावांची गरज असताना त्याने केवळ ७ धावाच खर्च केल्या.

Gujarat Titans vs Delhi Capitals Match Result
Kohli-Gambhir Altercation: जोरदार राडा होऊनही विराटला १ कोटी तर नवीन अन् गंभीरला निम्यापेक्षाही कमी दंड! असा भेदभाव का?

गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी केली. तो शेवटपर्यंत मैदानावर तग धरून उभा होता. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. दिल्लीचा यंदाच्या हंगामातील हा तिसरा विजय असून गुजरातचा तिसरा पराभव आहे. (Latest Marathi News)

दिल्लीकडून मिळालेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खराब झाली होती. पहिल्या ७ षटकातच ३२ धावांत गुजरातचे ४ फलंदाज माघारी परतले होते. मात्र, कर्णधार हार्दिक पांड्याने गुजरातचा डाव सावरला. त्याने अभिनव मनोहरसोबत पाचव्या विकेट्साठी ६२ धावांची भागीदारी केली. गुजरातचा स्कोअर ९४ धावा असताना आयुष बदोनी बाद झाला.

दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकले होते. त्याच्या जोडीला आता राहुल तेवतिया आला होता. मात्र गुजरातला १२ चेंडूत ३३ धावांची गरज होती. सामना तसा अवघड होता. मात्र आईस मॅन राहुल तेवतियाने १९ वे षटक टाकणाऱ्या नॉर्त्जेच्या शेवटच्या तीन षटकात तीन षटकार ठोकले. या षटकात तब्बल २१ धावा झाल्या. आता सामना ६ चेंडू आणि १२ धावा असा आली होता. (Viral News)

अनुभवी इशांत शर्माने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने पहिल्या चेंडूवर २ दुसऱ्या चेंडूवर १ धाव दिली. तिसरा चेंडू निर्धाव टाकला. तर चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाला बाद केले. शेवटच्या दोन चेंडूवर ९ धावांची गरज असताना राशिद खान स्ट्राईकवर होता. मात्र राशिदला फक्त दोन धावा करता आल्या आणि इशांतने दिल्लीचा विजय साकार केला. (Latest Sports Updates)

तत्पुर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ८ गडी गमावून १३० धावा केल्या. दिल्लीकडून अमन खानने ४४ चेंडूत ५१ धावा केल्या. याशिवाय ३० चेंडूत २७ धावांची खेळी केली.

दिल्लीकडून मोहमद शमीने भेदक मारा करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहित शर्माने २ तर राशिद खानने १ विकेट्स घेतली. दिल्लीकडून अक्षर, रिपल, आणि अमन खान व्यतिरिक्त एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com