Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Result
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match ResultTwitter

KKR vs SRH Match Result: हातातून निसटणारा सामना वरुण चक्रवर्तीने फिरवला; शेवटच्या षटकात केकेआरचा थरारक विजय

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Result: श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर ५ धावांनी विजय मिळवला

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Result: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद संघात रंगदार सामना झाला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर ५ धावांनी विजय मिळवला. वरूण चक्रवर्ती हा कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. शेवटच्या षटकात हैदराबादला ६ चेंडूत ९ धावांची गरज असताना चक्रवर्तीने जबरदस्त गोलंदाजी करत सामना फिरवला. (Latest sports updates)

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Match Result
Virat Kohli-Gautam Gambhir : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर १.०७ कोटींचा दंड विराट कोहली भरणार नाही, कारण...

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर प्रथम नाणेफेक जिंकून केकेआरने हैदराबादसमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात खराब झाली. केकेआरने पहिल्या ६ षटकातच हैदराबादला ४ जबर धक्के दिले.

हर्षित राणाने तिसऱ्याच षटकात मयांक अग्रवालला बाद केलं. अग्रवालने ११ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकुरने अभिषेक शर्माची विकेट्स काढली. अभिषेक केवळ ९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या राहुल त्रिपाठीने कोलकाताच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं.

त्याने तुफान फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र, रसेलला मोठा फटका मारण्याच्या नादात तोही बाद झाला. राहुलने ९ चेंडूत झटपट २० धावांची खेळी केली. दुसरीकडे हॅरी ब्रुकला देखील अनुकूल रॉयने एलबीडब्यू केलं. ब्रुकला भोपळाही फोडता आला नाही.

एकवेळ हैदराबादची स्थिती ४ बाद ५४ अशी झाली असताना कर्णधार एडन मार्करमने हेरनी क्लासेनच्या मदतीने डाव सावरला. दोघांनी मिळून पाचव्या विकेट्साठी ७० धावांची भागीदारी केली. क्लासेनने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने २० चेंडूतच ३६ धावा कुटल्या. यामध्ये ३ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.

हैदराबाद हा सामना सहज जिंकणार असं वाटत असताना शार्दुल ठाकूरने क्लासेनला बाद केलं. त्यानंतर वैभव अरोडाने मार्करमला तंबूचा रस्ता दाखवला. मार्करमने ४० चेंडूत ४१ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात हैदराबादला ६ चेंडूत विजयासाठी ९ धावांची गरज होती. अब्दुल समद हा फलंदाजी करत होता. वरूण चक्रवर्तीने समदला बाद केलं. त्यामुळे शेवटच्या षटकात हैदराबादला केवळ ३ धावाच काढता आल्या. त्यामुळे केकेआरचा ५ धावांनी विजय मिळवला. टाकला.

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या. केकेआरकडून नितीश राणाने ३१ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने ४६ धावांची खेळी केली. याशिवाय आंद्रे रसेलने झटपट २४ धावा कुटल्या. हैदराबादकडून मार्को यान्सन आणि टी नटराजनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com