Suryakumar Yadav: एकच वादा सूर्या दादा, गुजरातला एकटाच भिडला; शतक ठोकून पांड्यालाही फोडला घाम!

Suryakumar Yadav Best Batting: सूर्यकुमार यादव गुजरातच्या संघाला एकटाच भिडला. त्याला यावेळी चांगली साथ मिळाली ती विष्णू विनोदची. पण विनोदपेक्षा सूर्या यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले.
Suryakumar Yadav Best Batting Mumbai Indians vs Gujarat Titans Match
Suryakumar Yadav Best Batting Mumbai Indians vs Gujarat Titans MatchSaam TV

Suryakumar Yadav Best Batting Mumbai Indians vs Gujarat Titans Match: मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राशिद खानच्या जोरदावर त्याने मुंबईची अवस्था ३ बाद ८८ अशी केली. पावरप्लेमध्ये चांगली खेळी करणारे इशान किशन आणि रोहित शर्मा एकापाठोपाठ एक माघारी परतले. मात्र, त्यानंतर मैदानावर सूर्या नावाचं वादळ आलं. या वादळात गुजरातच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला.  (Latest sports updates)

Suryakumar Yadav Best Batting Mumbai Indians vs Gujarat Titans Match
MI vs GT Match Updates: नाद करा पण सूर्याचा कुठं! वानखेडेवर गुजरातला बेक्कार चोपलं; मुंबईने उभारला धावांचा डोंगर

मुंबईचे एकापाठोपाठ एक असे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव गुजरातच्या संघाला एकटाच भिडला. त्याला यावेळी चांगली साथ मिळाली ती विष्णू विनोदची. पण विनोदपेक्षा सूर्या यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. सूर्याने यावेळी ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि मुंबईच्या संघाला आधार दिला.

गेल्या काही सामन्यापासून फॉर्ममध्ये नसलेल्या सूर्यकुमारला या सामन्यात चांगलीच लय सापडली. त्याने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मैदानावर आलेलं सूर्यकुमार यादव नावाचं वादळ पाहून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच थंड पडला.

सूर्यकुमारच्या फलंदाजीपुढे एकाही गोलंदाजाचा निभाव लागत नसल्याने हार्दिक पांड्यालाही चांगलाच घाम फुटला होता. दरम्यान, सूर्यकुमार यादवने २० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि आपले शतक पूर्ण केले. सूर्याने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर १०३ धावांची खेळी साकारली. या शतकाच्या जोरावर सूर्याने मुंबईच्या संघाला विजयाचा पाया रचता आला.

मुंबईचे गुजरातसमोर २१९ धावांचे आव्हान

सूर्यकुमार यादव ४९ चेंडूत १०३ धावा, त्याला रोहित शर्मा, इशान किशन, युवा फलंदाज विष्णू विनोदने दिलेल्या चांगल्या साथीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर विजयासाठी २१९ धावांचं आव्हान ठेवलं. गुजरातकडून राशिद खानने ४ षटकात ३० धावा देत ४ गड्यांना बाद केलं. राशिद खान वगळता गुजरातचे इतर गोलंदाज हे धावा रोखण्यात अपयशी ठरले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com