IPL 2023, MI vs LSG: रोहित शर्माची एक चूक अन् स्टॉयनिसने साधली संधी; लखनौचे मुंबईला १७८ धावांचे आव्हान

IPL2023, MI vs LSG Live Match: लखनौकडून मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्याने जबरदस्त खेळी केली. स्टॉयनिसने ४७ चेंडूत ८९ धावा कुटल्या.
IPL2023, MI vs LSG Live Match
IPL2023, MI vs LSG Live MatchIPL/Twitter

IPL2023, MI vs LSG Live Match: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात सुरू आहे. दोन्ही संघासाठी प्ले-ऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर विजयासाठी १७८ धावांचं लक्ष ठेवलं आहे. (Latest sports updates)

लखनौकडून मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्याने जबरदस्त खेळी केली. स्टॉयनिसने ४७ चेंडूत ८९ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ४ चौकार लगावले. तर कृणाल पांड्याने ४२ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफने २ विकेट्स आणि पियूष चावलाने १ विकेट्स घेतली.

IPL2023, MI vs LSG Live Match
MI vs LSG Updates: मुंबईला पराभूत करण्यासाठी गंभीरने आखला प्लॅन; लखनौच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री

लखनौच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात  मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौची सुरूवात अत्यंत खराब झाली. जेसन बेहरनड्रॉर्फने तिसऱ्याच षटकात दीपक हुड्डाला आणि प्रेरक मंकडला माघारी पाठवलं. हुड्डाने ५ धावा केल्या तर मंकडला भोपळाही फोडता आला नाही.

त्यानंतर पियूष चावलाने क्विंटन डी कॉकला माघारी (Cricket News) पाठवत लखनौला बॅकफूटवर ढकललं. डिकॉक १५ चेंडूत १६ धावा काढून बाद झाला. पहिल्या ६ षटकात लखनौची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिसने लखनौचा डाव सावरला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी ८२ धावा जोडल्या.

कृणाल पांड्या ४२ चेंडूत ४९ धावा काढून रिटायर हर्ट झाला. त्यानंतर (Sport Updates) स्टॉयनिसने निकोलस पूरनच्या साथीने मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. एकवेळ लखनौची अवस्था १७ षटकात ३ बाद १२३ अशी होती. त्यानंतर रोहित शर्माने जॉर्डनच्या हाती चेंडू सोपावला. स्टॉयनिसने याच संधीचा फायदा घेतला. त्याने जॉर्डनच्या एकाच ओव्हरमध्ये तब्बल २४ धावा कुटल्या.

त्यानंतर बेहरनड्रॉफने टाकलेल्या १९ व्या षटकात स्टॉयनिसने १५ धावा काढल्या. शेवटच्या षटकात निकोलस पूरन आणि स्टॉयनिसने १५ धावा काढत लखनौला निर्धारित २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांवर पोहचवले. मुंबईने शेवटच्या तीन षटकात ५४ धावा दिल्या. या तीन षटकातच लखनौचा संघ सुस्थितीत पोहचला.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com