LSG vs SRH Match Result: अशक्य वाटणारा विजय लखनौने खेचून आणला; 'पूरन' वादळाचा हैदराबादला तडाखा

LSG vs SRH Match Result: लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबादवर ७ विकेट्ने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयसह लखनौने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
LSG vs SRH Match Result
LSG vs SRH Match ResultIPL/Twitter

LSG vs SRH Match Result: युवा फलंदाज प्रेरक मंकडच्या ४५ चेंडूत नाबाद ६५ धावा, त्याला मार्कस स्टॉयनिसने दिलेली चांगली साथ आणि शेवटच्या काही षटकात निकोलस पूरनने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनराईजर्स हैदराबादवर ७ विकेट्ने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयसह लखनौने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.  (Latest sports updates)

हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सनराईजर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी १८३ धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून हेन्री क्लासनने ४७ धावांची अब्दुल समादने नाबाद ३७ धावांची खेळी केली.

LSG vs SRH Match Result
Quinton De Kock Catch: डी कॉक बनला सुपरमॅन! भन्नाट कॅच पाहून तुम्हीही व्हाल फॅन - VIDEO

सलामीवीर अनमोलप्रीतनेही ३६ धावांचे योगदान दिले. लखनौकडून कृणाल पांड्याने २ विकेट्स घेतल्या. हैदराबादने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा (IPL 2023) पाठलाग करताना, लखनौची सुरूवात अत्यंत खराब झाली. ग्लेन फिलिप्सने सलामीवीर काईल मेयर्सला झटपट माघारी पाठवलं. त्यानंतर क्विंटन डी कॉक सुद्धा २९ धावा काढून माघारी परतला. पहिल्या ८ षटकात लखनौची अवस्था २ बाद ५४ अशी झाली होती.

मात्र, त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने युवा फलंदाज प्रेरक मंकडच्या साथीने लखनौच्या धावसंख्येला गती दिली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्साठी ७३ धावांची भागीदारी केली. मात्र, अभिषेक शर्माने स्टॉयनिसला बाद करत ही (Sport Updates) भागीदारी फोडली. स्टॉयनिस २५ चेंडूत ४० धावा काढून बाद झाला. त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले.

स्टॉयनिस बाद झाल्यानंतर मैदानावर निकोलस पूरन नावाचं (Cricket News) वादळ आलं. लखनौ हा सामना हरणार असं वाटत असताना पूरनने मैदानात चौकार आणि षटकारांची बरसात केली. त्याने १३ चेंडूत नाबाद ४४ धावा कुटल्या आणि लखनौला विजय मिळून दिला. पूरनने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले.

लखनौसाठी युवा फलंदाज प्रेरक मंकडची खेळी सुद्धा मॅचविनर ठरली. प्रेरकने ४५ चेंडूत नाबाद ६५ धावा कुटल्या. यामध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हैदराबादकडून मयंक मार्कंडेय, ग्लेन फिलिप्स आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली. त्यांच्या व्यतिरिक्त इतर गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com