RR vs GT Match Result: पांड्या वादळात राजस्थान भुईसपाट; गुजरातचा IPL 2023 मध्ये सर्वात मोठा विजय

Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Result: गुजरातने राजस्थानवर ३७ चेंडू आणि ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गुजरातचा हा आयपीएलमधला सर्वात मोठा विजय ठरला.
Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Result
Rajasthan Royals vs Gujarat Titans Match ResultTwitter

Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Result: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४८ वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्याने गुजरातने राजस्थानवर ३७ चेंडू आणि ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गुजरातचा हा आयपीएलमधला सर्वात मोठा विजय ठरला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत आपला पहिलं स्थान अधिकच पक्क केलं आहे. (Latest sports updates)

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने गुजरातपुढे ११९ धावांचं छोटेखानी आव्हान उभं ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात अतिशय दमदार झाली. पावरप्लेमध्ये वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलले धमाकेदार सुरूवात केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी ९ षटकातच ७१ धावांची भागिदारी केली.

Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Result
KL Rahul Ruled Out: 10 मिनिटांचा निष्काळजीपणा टीम इंडियाला नडला; संघातील स्टार खेळाडू WTC च्या फायनलमधून बाहेर

शुभमन गिल आज चांगला फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने एकापेक्षा एक असे अप्रतिम फटके मारले. त्याला वृद्धिमान साहाने देखील चांगली साथ दिली. मात्र चहलला मोठा फटका मारण्याच्या नादात शुभमन गिल बाद झाला. गिललने ३५ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. त्याने ६ चौकार लगावले. गिल बाद झाल्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

पांड्याने पहिल्याच चेंडूपासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. पांड्याने आणि वृद्धिमान साहाने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अखेर गुजरातने हा सामना ३७ चेंडू आणि ९ विकेट्स राखून जिंकला. हार्दिक पांड्याने १५ चेंडूत नाबाद ३९ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर वृद्धिमान साहाने ३४ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली.

तत्पुर्वी नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी असार्थ ठरवला. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात जोश बटलरला बाद केलं. बटलर ११ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सलामीवर यशस्वी जैस्वाल हा १४ धावा काढून धावबाद झाला.

दरम्यान, कर्णधार संजू सॅमसनने देवदत्त पडिकलच्या साथीने राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून संघाचा स्कोअर ५० धावांच्या पार पोहचवला. मात्र, जोशुआ लिटलने संजू सॅमसनला बाद करत ही जोडी फोडली. सॅमसन ३० धावा काढून बाद झाला.

सॅमसन बाद झाल्यानंतर राशिद करामती खानच्या जादुई फिरकीसमोर राजस्थानचा संघ ढेपाळला. राशिदने रियान पराग रविचंद्रन आश्विन आणि शिमरोन हेटमायरला झटपट माघारी पाठवलं. या तिन्ही फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. नूर अहमदने पडिकलला बाद करत राजस्थानच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फेरलं.

राजस्थानच्या संघाला शंभरी सुद्धा गाठता येणार नाही, असं वाटत असताना तळातील फलंदाज ट्रेंड बोल्टने फटकेबाजी करत संघाला शंभरी पार करून दिली. मोहमद शमीच्या गोलंदाजीवर बोल्ड १५ धावा काढून बाद झाला. त्यामुळे राजस्थानच्या संघाला निर्धारित १७.५ षटकात ११८ धावाच काढता आल्या. गुजरातकडून राशिद खानने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय नूर अहमदने २ फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com