Kane Williamson: केन विलियमसनचा नादखुळा! शतकांची हॅट्रिक करत किंग कोहलीच्या 'या' मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

Kane williamson hattrick on century: केन विलियमसनने विराट कोहलीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
virat-kane
virat-kanefile photo

Kane Williamson record: सध्या श्रीलंका संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टनच्या मैदानवावर सुरु आहे.

या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसनने विराट कोहलीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

virat-kane
IND VS AUS: ना केएल राहुल, ना शमी! रविंद्र जडेजाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार का देण्यात आला? नेमकं कारण आलं समोर

श्रीलंका संघाविरुध्द सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विलियमसनने २१५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली आहे. या खेळीसह त्याने विराट कोहलीच्या शतकांची बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक झळकावले होते.

आता केन विलियमसनने देखील २८ वे शतक झळकावत विराटच्या शतकांची बरोबरी केली आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील ६ वे दुहेरी शतक ठरले आहे. (Latest sports updates)

virat-kane
Ind vs Aus 1st ODI: केएल राहुललाही महाकाल पावले! भन्नाट झेल अन् तुफानी अर्धशतक झळकावत केलं जोरदार कमबॅक

शतकांची हॅट्रिक करत रचला इतिहास..

श्रीलंका संघाविरुध्द झळकावलेले शतक हे केन विलीमयसनने झळकावलेले सलग तिसरे शतक आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यतील दुसऱ्या डावातही शतक झळकावले होते.

तर या मालिकापूर्वी इंग्लंड संघाविरुध्द झालेल्या सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. आता दुसऱ्या कसोटीतही शतक झळकावत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतकांची हॅट्रिक केली आहे. असा कारनामा करणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले होते. या पराभवामुळे श्रीलंका संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीतुन बाहेर झाला होता.

या सामन्यातही केन विलियमसनने महत्वाची खेळी केली होती. त्याने शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com