KL Rahul Injured : लाईव्ह सामन्यात के एल राहुल दुखापतग्रस्त! खांद्याचा आधार देऊन मैदानाबाहेर नेलं, पाहा Video

IPL 2023, LSG vs RCB: दुखापतग्रस्त राहुला चालता देखील येत नव्हतं, त्यामुळे त्याला संघातील सदस्यांनी खांद्याचा आधार देऊन मैदानाबाहेर नेलं.
KL Rahul injured in live match
KL Rahul injured in live matchsaam tv

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात लखनऊला लाइव्ह सामन्यादरम्यान मोठा झटका बसला. संघाचा कर्णधार केएल राहुल क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं.

दुखापतग्रस्त राहुला चालता देखील येत नव्हतं, त्यामुळे त्याला संघातील सदस्यांनी खांद्याचा आधार देऊन मैदानाबाहेर नेलं. लखनऊ कॅम्पसाठी ही अतिशय वाइट बातमी आहे. राहुलची दुखापत अधिक गंभीर असल्यास लखनऊच्या स्पर्धेतील अडचणी वाढू शकतात.

KL Rahul injured in live match
LSG vs RCB Score: फिरकीच्या जाळ्यात फसले आरसीबीचे फलंदाज; लखनौला विजयासाठी १२७ धावांचं आव्हान

दरम्यान या सामन्याविषयी बोलायचे झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु वेगवान गोलंदाज नवीन उल हकचा भेदक मारा, त्याला फिरकीपटू अमित मिश्रा आणि रवि बिश्नोईने दिलेल्या चांगल्या साथीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बैंगळूरूला अवघ्या १२६ अवघ्या धावांवर रोखलं.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात आरसीबीचा संघ निर्धारित २० षटकात गड्यांच्या ९ मोबदल्यात १२६ धावाच करू शकला. लखनौकडून नवीन उल हकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर अमित मिश्रा, रवि बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. (Sports News)

KL Rahul injured in live match
Rohit Sharma Selfie: रोहीत सोबत सेल्फी काढायला गेला अन्... चाहत्याला सेल्फी घेणं पडलं महागात- VIDEO

दोन्ही संघांचे इलेव्हन पुढीलप्रमाणे आहेत

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, यश ठाकूर. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com