KL Rahul Ruled Out: 10 मिनिटांचा निष्काळजीपणा टीम इंडियाला नडला; संघातील स्टार खेळाडू WTC च्या फायनलमधून बाहेर

WTC Final: भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
team india
team indiasaam tv

WTC Final 2023: जे व्हायचं नव्हतं तेच झालं. भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. इतकंच नव्हे तर आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून देखील तो बाहेर झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच क्षेत्ररक्षण करत असताना त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला २ महत्वाच्या स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली आहे.

team india
IPL 2023 RR Vs GT: गुजरात घेणार का पराभवाचा बदला? जाणून घ्या कशी असेल RR vs GT सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर १ मे रोजी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता.

त्यावेळी त्याला मैदान सोडावं लागलं होतं. मात्र संघाला गरज असताना तो ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. मात्र तो धावा ही करू शकला नव्हता आणि आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नव्हता. हे १० मिनिटं फलंदाजी करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे.

team india
LSG New Captain : LSG ला मोठा धक्का! KL Rahul बाहेर! तर 'हा' खेळाडू होणार कर्णधार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर..

या सामन्यानंतर चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात तो खेळताना दिसून आला नव्हता या सामन्यानंतर तो स्कॅनसाठी मुंबईला रवाना झाला होता. त्यावेळी हे जवळ जवळ स्पष्ट झाले होते की, तो आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर होणार आहे.

मात्र ५ मे रोजी त्याने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, तो आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याने या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे की, महत्वाच्या क्षणी संघाची साथ सोडल्याने वाईट वाटत आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून देखील बाहेर झाला आहे. लवकरच त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली जाऊ शकते. (Latest sports updates)

आता पुढे काय?

केएल राहुलने पुढची प्लॅनिंग देखील सांगितली आहे. त्याने बीसीसीआयच्या मेडिकल टीम सोबत चर्चा केली आहे. त्याला दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला गेला आहे. या शत्रक्रियेनंतर केएल राहुलचं संपूर्ण लक्ष फिट होण्यावर असणार आहे.

त्याने म्हटले आहे की, हा कठीण निर्णय होता मात्र त्याला तोच निर्णय योग्य वाटला. तसेच त्याने फॅन्स, बीसीसीआय आणि संघातील इतर खेळाडूंचे आभार मानले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com