SRH vs LSG LIVE Score: क्लासेनची क्लास खेळी अन् समदचा फिनिशिंग टच; LSG ला विजयासाठी मोठं आव्हान

SRH vs LSG 1st Inning: सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु आहे
srh vs gt
srh vs gttwitter

SRH VS LSG IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना हेनरी क्लासेनच्या तुफानी खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १८२ धावा केल्या आहेत. लखनऊ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची गरज आहे.

srh vs gt
Rashid Khan Record: सूर्याचं शतक Rashid ने फिकं पाडलं! दिग्गजांना मागे सोडत IPL स्पर्धेत रचला इतिहास

या डावात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हेनरिक क्लासेनने हेनरिक क्लासिक खेळी केली. त्याने २९ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ३ षटकारांचा मदतीने ४७ धावांची खेळी केली. हेनरिक क्लासेन हा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

तर सलामीला आलेल्या अनमोलप्रीत सिंगने ७ चौकारांचा साहाय्याने ३६ धावांची खेळी केली. तर शेवटी अब्दुल समदने फिनिशिंग टच देत १ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ३७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर ६ गडी बाद १८२ धावा केल्या. (Latest sports updates)

srh vs gt
Suryakumar Yadav Memes: 'तुमचा नादच लई डेंजर,आमचा सूर्या हो गेम चेंजर' तुफानी खेळीनंतर सोशल मीडियावर भन्नाट memes व्हायरल

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

सनरायझर्स हैदराबाद:

अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी

लखनऊ सुपर जायंट्स:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), काइल मेयर्स, कृणाल पंड्या (कर्णधार ), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com