LSG vs RCB Match Result: नाद करा पण RCB चा कुठं! चिन्नास्वामीच्या पराभवाचा घरात घुसून घेतला बदला; LSG वर मिळवला दणदणीत विजय

LSG vs RCB Highlights : आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम गोलंदाजीने लखनऊ सुपर जायंट्स संघाची बोलती बंद केली आहे
virat kohli
virat kohlitwitter

IPL 2023: चिन्नास्वामीच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी गौतम गंभीरने चिन्नास्वामीच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बोट दाखवून गप केलं होतं. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम गोलंदाजीने लखनऊ सुपर जायंट्स संघाची बोलती बंद केली आहे. १२७ धावांचा पाठलाग करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ धावांनी विजय मिळवला आहे.

virat kohli
Virat Kohli IPL 2023 : आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते विराट कोहली करणार, नव्या विक्रमाला घालणार गवसणी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केल्या १२६ धावा..

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. तर सलामीला आपल्या विराट कोहलीने ३१ धावांचे योगदान दिले. तसेच दिनेश कार्तिकने शेवटी फलंदाजीला येऊन १ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १६ धावांची खेळी केली. २० षटक अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ९ गडी बाद केवळ १२६ धावा करता आल्या. (Latest sports updates)

virat kohli
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

लखनऊची फ्लॉप फलंदाजी..

लखनऊ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२० चेंडूंमध्ये केवळ १२७ धावा करायच्या होत्या. मात्र लखनऊ सुपर जायंट्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्या डावात दुखापतग्रस्त झालेला केएल राहुल या डावात फलंदाजी करण्यासाठी येऊ शकला नव्हता. त्याच्याऐवजी काईल मेयर्स आणि आयुष बदोनी यांची जोडी मैदानात आली होती. मात्र दोघेही स्वस्तात माघारी परतले.

काईल मेयर्स ० तर आयुष बदोनी अवघ्या ४ धावा करून बाद झाला. लखनऊ सुपर जायंट्स संघातील कृष्णप्पा गौतमला सोडलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक २३ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com