
RR VS RCB IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना आज दुपारी ३:३० वाजता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार आहे.
प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. राजस्थान रॉयल्स संघ गेल्या सामन्यात विजय मिळवून आला आहे.
या संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध विजय मिळवला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून पराभूत होऊन आला आहे.
राजस्थानचे फलंदाज जोरदार फॉर्ममध्ये..
राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ९८ धावांची खेळी केली होती.
तर जोस बटलर देखील जोरदार फॉर्ममध्ये आहे. तो गेल्या सामन्यात लवकर आउट झाला होता. मात्र त्याची एकंदरीत कामगिरी पाहिली तर तो फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले आहे. फलंदाजीसह गोलंदाज देखील चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले आहे.
युजवेंद्र चहलने गेल्या २ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट देखील चांगली गोलंदाजी करत आहेत. (Latest sports updates)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाज सध्या निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहेत. मुंबई इंडियन्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे गोलंदाज २०० धावांचा बचाव करू शकले नव्हते. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अचूक टप्पा मिळत नाहीये. तर जोश हेजलवूडची चांगलीच धुलाई होतेय.
फिरकी गोलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर वनिंदूं हंसरंगाला अजूनपर्यंत सूर गवसला नाहीये. गेल्या हंगामात त्याने चांगली कामगिरी केली होती.
मात्र यावेळी अशी कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला आहे. तर फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस जोरदार कामगिरी करत आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत फाफ डू प्लेसिस अव्वल स्थानी आहे.
अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११ (RR VS RCB Playing 11)
राजस्थान रॉयल्स संभावित प्लेइंग 11: यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन, जो रूट, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युजवेंद्र चहल
रॉयल चैलेंजर्स बैंगलोर संभावित प्लेइंग 11: विराट कोहली, फाफ डुप्लेसी, ग्लेनमॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, केदार जाधव, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, विजय कुमार वैशाख, मोहम्मद सिराज, जोस हेजलवुड
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.