Arjun Tendulkar Memes: 'किसी का भाई किसी की जान', GT VS MI सामन्यानंतर सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस

Shubman Gill And Arjun Tendulkar Memes: या विजयानंतर अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे भन्नाट मिम्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.
Shubman Gill -  Arjun Memes
Shubman Gill - Arjun Memestwitter

Shubman Gill And Sara Tendulkar: गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघातील गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत मुंबई इंडियन्स संघावर जोरदार विजय मिळवला.

दरम्यान या विजयानंतर अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे भन्नाट मिम्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.

Shubman Gill -  Arjun Memes
Arjun Tendulkar Six: नॉर्मल माणूस वाटलोय का? हलक्यात घेणाऱ्या वढेराला Arjun ने दिले जोरदार प्रत्युत्तर - VIDEO

या सामन्यात गुजरातच्या विजयापेक्षा अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिलची अधिक चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकर, शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

हा सामना सुरु होण्यापूर्वीच अर्जुन तेंडुलकर आणि शुभमन गिल हे दोघेही सोशल मीडियावर ट्रेंडींगला होते. यामागचं कारण म्हणजे अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकर.

सोशल मीडियावर अशा चर्चा सुरु आहेत की, सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघांनीही याबाबत कुठलाही खुलासा केला नाहीये. (Latest sports updates)

सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल..

गुजरात टायटन्सचा जोरदार विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर डेव्हीड मिलरने ४६ आणि अभिनव मनोहरने ४२ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी बाद २०७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेहाल वढेराने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली.

तर ग्रीनने ३३ धावांची खेळी केली. मुंबईला या डावात ९ गडी बाद १५२ धावा करता आल्या. या सामन्यात मुंबईला ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com