Shubman Gill Catch Controversy : शुभमन गिल NOT OUT होता? बाद घोषित करताच सोशल मीडियावर पेटला नवा वाद

Shubman Gill Wicket : शुभमन गिलच्या विकेटनंतर आता एक नवा वाद पेटला आहे.
shubman gill wicket
shubman gill wickettwitter

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या रोमांचक सामन्याच्या चौघ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ गडी बाद २८० धावांवर घोषित केला आहे.

तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता ४४४ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा फलंदाज शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला आहे. मात्र शुभमन गिलच्या विकेटनंतर आता एक नवा वाद पेटला आहे.

shubman gill wicket
WTC Final 2023: टीम इंडियाला जिंकायचं असेल तर मोडावा लागेल १२१ वर्षांपूर्वीचा 'हा' मोठा रेकॉर्ड

शुभमन गिल की बाद की नाबाद?

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली होती. मात्र स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर शुभमन गिलला पॅव्हेलियनची वाट धरावी लागली आहे.

तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाकडून ८ वे षटक टाकण्यासाठी स्कॉट बोलँड गोलंदाजीला आला होता. त्यावेळी स्कॉट बोलँडने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. या चेंडूवर शुभमन गिलने हलक्या हाताने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र चेंडू बॅटचा कडा घेत, स्लिपमध्ये असलेल्या कॅमरुन ग्रीनच्या हातात गेला. झेल टिपताच त्याला बाद घोषित केलं गेलं होतं. मात्र झेल व्यवस्थितरित्या टिपला गेला आहे की नाही, हे पाहण्यासाठी थर्ड अंपायरकडे निर्णयाची निर्णय पाठवण्यात आला होता. त्यावेळी थर्ड अंपायरने त्याला बाद घोषित केलं. (Latest sports updates)

shubman gill wicket
WTC Final Ind vs Aus : टीम इंडियाकडे अजूनही संधी; चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फिरकी घेणार, कसं असेल गणित?

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया..

शुभमन गिलला बाद घोषित करताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, शुभमन गिल नाबाद होता. जेव्हा त्याने झेल टिपला त्यावेळी चेंडू हा जमिनीला स्पर्श झाला होता. आता शुभमन गिलच्या विकेटनंतर सोशल मीडियावर नॉट आऊट हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com