फुटबाॅल विश्वकरंडकासाठी शिपिंग कंटेनरपासून बनवले स्टेडियम

पुढील वर्षी कतार येथे होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वकरंडकासाठी नव्याने ‘९७४’ हे स्टेडिअम बांधले गेले आहे
९७४’ स्टेडिअम
९७४’ स्टेडिअम-ANI


दोहा : पुढील वर्षी कतार Quatar येथे होणाऱ्या फिफा फुटबॉल FIFA FootBall विश्वकरंडकासाठी नव्याने ‘९७४’ हे स्टेडिअम बांधले गेले आहे. आगामी अरब चषकाच्या सामन्याने या स्टेडिअमचे उद्‍घाटन होणार आहे. पूर्वी ‘रास अबू अबुद स्टेडिअम’ Ras Abud Stadium म्हणून ओळखले जाणाऱ्या या मैदानाचे नाव आता बदलून स्टेडिअम ९७४' असे ठेवण्यात आले आहे. Sports News FIFA Stadium ready for World cup in Quatar

त्याच्या या विशेष नावामागील कारण म्हणजे हे मैदान तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले ९७४ शिपिंग कंटेनर. बांधण्यात आलेले हे स्टेडिअम दोहा बंदराच्या अगदी जवळ आहे. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे स्टेडिअम पूर्णपणे नष्ट होऊ शकते. त्यामुळे विश्वकरंडकासाठी तयार करण्यात आलेले व पुर्णप्रकारे नष्ट होऊ शकणारे हे जगातील पहिलेच मैदान ठरणार आहे.
‘९७४’ हे कतार विश्वकरंडकासाठी तयार करण्यात आलेले सातवे ठिकाण आहे.

हे देखिल पहा-

हतत्पूर्वी, कतारने विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आणखी सहा स्टेडियमचे उद्‍घाटन केले आहे. खलिफा इंटरनॅशनल, अल झैनाब, एज्युकेशन सिटी, अहमद बिन अली, अल बायत आणि अल थुमामा अशी त्यांची नावे आहेत. कतार विश्वकरंडक स्पर्धेला पुढील वर्षी २१ नोव्हेंबर २०२२ पासून सुरुवात होणार आहे.

९७४’ स्टेडिअम
मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरून तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

‘‘स्टेडियम ९७४ पूर्ण झाल्याची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. मध्य पूर्व आणि अरब जगतातील पहिल्या फिफा विश्वकरंडकाच्या वाटेवरील हा आणखी एक मैलाचा दगड आहे. आमच्या मजबूत विश्वकरंडक वारशाचे हे आणखी एक उदाहरण आहे. एकावेळी ४० हजार प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या या ९७४ स्टेडिअमवर विश्वकरंडकाच्या अंतिम १६ पर्यंतचे एकूण सहा सामने खेळवले जातील.’’ असे विश्वकरंडक संयोजन समितीचे सरचिटणीस हसन अल थवाडी यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com