WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाचं आता काही खरं नाही! WTC फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज फिट होऊन इंग्लंडला रवाना

Jaydev Unadkat Injury : या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
wtc final
wtc final saam tv

Ind vs Aus WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ७ ते ११ जून दरम्यान हा सामना रंगणार आहे.

इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

wtc final
CSK vs GT,IPL Final 2023: फॅन्ससाठी गुड न्यूज! सामना पुढे ढकलताच BCCI ने घेतला मोठा निर्णय

अंतिम सामन्यापूर्वी फिट झाला घातक गोलंदाज..

आयपीएल २०२३ \स्पर्धेदरम्यान सराव करताना ३१ वर्षीय जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) दुखापतग्रस्त झाला होता. नेट्समध्ये सराव करत असताना त्याचा तोल गेला होता. त्यामुळे सर्व वजन त्याच्या उजव्या खांद्यावर येऊन तो दुखापतग्रस्त झाला होता.

या कारणामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी त्याने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तो पूर्णपणे फिट असून इंग्लंडला रवाना झाला आहे.

तब्बल १२ वर्षे पाहिली संधीची वाट..

जयदेव उनाडकट बद्दल बोलायचं झालं तर त्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय संघासाठी कमबॅक केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या जोरदार कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळाली होती.

आता त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची देखील संधी मिळाली आहे. यापूर्वी त्याला २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

तसेच त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, ७ वनडे सामन्यांमध्ये त्याने ८ विकेट्स आणि १० टी -२० सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. तर २ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com