Ravindra Jadeja Record : सर जडेजाने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Ravindra Jadeja Record IND vs AUS 2nd Test Match
Ravindra Jadeja Record IND vs AUS 2nd Test MatchSaam TV

Ravindra Jadeja Record : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १ डाव आणि तब्बल १३२ धावांनी पराभव केल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यातही दमदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला केवळ 263 धावांवरच रोखलं आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा आपला जलवा दाखवला आहे. (Latest Sports Updates)

Ravindra Jadeja Record IND vs AUS 2nd Test Match
IND VS AUS 2nd Test:मैदानात पाऊल ठेवताच विराटनं पूर्ण केलं खास 'शतक', असा कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय

अनुभवी रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अचूक टप्प्याच्या मारावर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतही दमदार सुरूवात केली. या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजाने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद करत ही कामगिरी केली आहे.

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) कसोटी क्रिकेटमध्ये 250 बळी पूर्ण केले आहेत. या सामन्यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 249 विकेट घेतल्या होत्या. उस्मान ख्वाजाची विकेट्स घेताच त्याने 250 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 बळी आणि 2500 धावा करणारा जडेजा पहिला भारतीय ठरला आहे.

रवींद्र जडेजाने आतापर्यंत 62 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 2593 धावा करण्यासोबतच 250 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 3 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये नाबाद 175 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर 48 धावांत 7 बळी अशी त्याची सर्वेत्तम कामगिरी आहे.

Ravindra Jadeja Record IND vs AUS 2nd Test Match
IND VS AUS nd Test: अनलकी पुजारा! १०० व्या कसोटीत शून्यावर बाद होताच झाली नकोशा विक्रमाची नोंद

रवींद्र जडेजाने 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात कसोटी पदार्पण केले होते. गेल्या 10 वर्षांपासून तो टीम इंडियाचा नियमित भाग आहे. दुसरीकडे, एकूण विक्रमावर नजर टाकली, तर हा विक्रम करणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या इयान बॉथमने 55 कसोटीत 250 बळी आणि 2500 धावा केल्या होत्या.

भारताकडून (Team India) सर्वाधिक कसोटी बळी घेणारा जडेजा आठवा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे 619, आर अश्विन 457, कपिल देव 434, हरभजन सिंग 417, इशांत शर्मा 311, झहीर खान 311 आणि बिशन सिंग बेदी यांनी 266 विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे रवींद्र जडेजाचं टीम इंडियात कौतुक होत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com