Who Is Naveen Ul Haq: Virat सोबत पंगा घेणारा अवघ्या २३ वर्षांचा Naveen आहे तरी कोण? यापूर्वी देखील मैदानात केलाय राडा..

Virat kohli Vs Naveen Ul Haq: लखनऊ सुपर जायंट्स संघाचा गोलंदाज नवीन उल हक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
naveen ul haq
naveen ul haqsaam tv

LSG VS RCB IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स संघाचा गोलंदाज नवीन उल हक (Naveen Ul haq) सध्या चर्चेचा विषय ठरतोय. किंग कोहली आणि नवीन उल हक यांच्यात सामन्यादरम्यान जोरदार बाचाबाची झाली. नवीन जेव्हा फलंदाजी करत होता त्यावेळी विराट त्याला काहीतरी बोलताना दिसून आला होता.

दोघांमध्ये इतकं वाजलं की अंपायरला हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान सामना झाल्यानंतर तर हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले होते. (Who Is Naveen Ul Haq)

naveen ul haq
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

हे प्रकरण इथेच थांबलं नाही, तर सामना झाल्यानंतर जेव्हा नवीन उल हकमुळे विराट कोहली आणि गौतम गंभीर देखील आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर कर्णधार केएल राहुलने प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने नवीन उल हकला माफी मागण्यास सांगितले.

मात्र तरीदेखील नवीन उल् हकचा अॅटीट्युड काही कमी होत नव्हता. या कृत्यानंतर बीसीसीआयने तिघांवर कारवाई केली आहे. नवीन उल हकला मॅच फीच्या ५० तर विराट कोहली आणि गौतम गंभीरवर १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. (latest sports updates)

naveen ul haq
IPL 2023 MI vs RR Match: IPL च्या १६ वर्षांच्या इतिहासात '३० एप्रिल' ही तारीख नेहमी लक्षात ठेवली जाईल, वाचा नेमकं काय घडलं?

आता प्रश्न हा पडतो की, नेहमी चूक कोणाची? तसं पाहायला गेलं तर विराट कोहली हा मैदानात आक्रमक भूमिकेत असतो. मात्र नवीन उल हकचा भूतकाळ पहिला तर तो अनेकदा वरिष्ठ खेळाडूंसोबत हुज्जत घालताना दिसून आला आहे. श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये तो थिसारा परेरा, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मोहम्मद आणि शाहिद आफ्रिदी सोबत बाचाबाची करताना दिसून आला होता.

कोण आहे नवीन उल हक?

विराटमुळे चर्चेत आलेला नवीन उल हक हा अवघ्या २३ वर्षांचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ७ वनडे सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १४ विकेट्स घेतल्या आहेत.

तर फलंदाजी करताना २१ धावा केल्या आहेत. तसेच टी -२० क्रिकेटमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, २७ टी -२० सामन्यांमध्ये त्याने ३४ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com