
Virat Kohli Instagram Story: कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या घरच्या मैदानावर सुरु होता. सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक आपल्या संघाला सपोर्ट न करता विरोधी संघातील फलंदाजाच्या फलंदाजीचा आनंद घेत होते.
ईडन गार्डन्सच्या मैदानावर मुंबईकर यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या खेळीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान विराट कोहलीने त्याचं कौतुक करणारी स्टोरी शेअर केली आणि अवघ्या काही मिनिटात ती डिलीट देखील केली. यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
यशस्वी जयस्वालने या डावात नाबाद ९८ धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या खेळीनंतर अनेक दिग्गज खेळाडू त्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत. विराट कोहलीने देखील त्याचा फोटो शेअर केला होता.
जो अवघ्या काही मिनिटात त्याने डिलीट केला. यामागचं कारण असं की, विराटने जो फोटो शेअर केला होता. त्यावर जिओ सिनेमाचा लोगो असल्याचे दिसून येत होते.
हे निदर्शनात येताच त्याने ती स्टोरी डिलीट केली. त्यांनतर त्याने जिओ सिनेमाचा लोगो क्रॉप करून पुन्हा एकदा स्टोरी शेअर केली. (Latest sports updates)
काय आहे यामागचं कारण?
विराट कोहली हा स्टार स्पोर्ट्सचा ब्रँड अँबेसेडर आहे. आयपीएल २०२३ स्पर्धा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर देखील प्रक्षेपित केली जात आहे. तसेच जिओ सिनेमावर ही स्पर्धा विनामूल्य दाखवली जात आहे. विराट कोहली स्टार स्पोर्ट्सचा ब्रँड अँबेसेडर असल्याने तो जिओ सिनेमाचं काही शेअर करू शकत नाही. कारण दोघेही आता प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे विराटने ही पोस्ट डिलीट केली होती.
त्यानंतर विराटने पुन्हा स्टोरी शेअर करत यशस्वीचे कौतुक देखील केले आहे. त्याने या स्टोरीला कॅप्शन देत लिहिले की, 'खूप दिवसानंतर अशी खेळी पाहायला मिळाली. काय टँलेन्टेड खेळाडू आहे हा..' यशस्वी जयस्वाल बद्दल बोलायचं झालं तर त्याने या स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये आतापर्यंत ५७५ धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी १५० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने नाबाद ९८ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने नाबाद ४८ धावांची खेळी केली. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून विजय मिळवला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.