WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात भितीचं वातावरण! एकतर्फी सामना फिरवणारा स्टार फलंदाज ठरू शकतो धोक्याची घंटा

Yashasvi Jaiswal: भारतीय संघात अशा एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे, ज्याला संधी मिळताच ऑस्ट्रेलियाची चिंता वाढू शकते.
team india
team indiasaam tv

IND vs AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला दाखल झाला असून, भारतीय खेळाडूंनी सराव करायला सुरुवात केली आहे.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्यांदा ही ट्रॉफी हुकली होती. मात्र यावेळी भारतीय संघातील खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतात.

दरम्यान भारतीय संघात अशा एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे, ज्याला संधी मिळताच ऑस्ट्रेलियाची चिंता वाढू शकते.

team india
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

अंतिम सामन्यात या खेळाडूला संधी मिळाली तर ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढणार..

आयपीएल २०२३ स्पर्धेत युवा फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यापैकीच एक नाव म्हणजे यशस्वी जयस्वाल. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना या फलंदाजाने तुफान कामगिरी केली.

या कामगिरीची दखल घेत त्याला भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. जर प्रमुख १५ खेळाडूंपैकी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर यशस्वीला संघात स्थान मिळू शकतं. ओव्हलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.

यशस्वी जयस्वाल हा फिरकी गोलंदाजांविरुद्ध टीचुन फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला संधी मिळाली तर, एकट्याच्या बळावर संघाला सामना जिंकून देऊ शकतो. (Latest sports updates)

team india
CSK Trophy : देव पावला! IPL जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी -VIDEO

डाव्या हाताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना त्याने अनेकदा आक्रमक सुरुवात करून दिली होती.

त्याच्या आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, १४ सामन्यांमध्ये त्याने ६२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८२ चौकार आणि २६ षटकार मारले आहेत. त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. मात्र जर संधी मिळाली तर नक्कीच हा फलंदाज संधीचं सोनं करू शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com