कृषी दुकानदारांकडून केली जाणारी शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवा - पंकजा मुंडे

विनोद जिरे
मंगळवार, 8 जून 2021

शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केलीय. 

बीड  - बीड जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून, बी-बियाणे, खते वाढीव दराने विकली जात आहेत. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून तक्रारी देखील केल्या जात आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांची होणारी हि लूट तात्काळ थांबवण्यात यावी. अशी मागणी भाजप BJP नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. Stop the looting of farmers by agricultural shopkeepers immediately - Pankaja Munde

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळमध्ये काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’ आंदोलन

दिलेल्या पत्रात मुंडे म्हणाल्या की, सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते Fertilizers व बी-बियाणांची Seeds मागणी वाढत आहे. कोरोनामुळे Corona अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी Agricultural दुकाने Shops याची चढ्या भावाने विक्री करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.

हे देखील पहा -

शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावीत आणि शेतकऱ्यांची Farmers आर्थिक लूट Loot थांबवावी. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी Demand पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे Collector केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe  


संबंधित बातम्या

Saam TV Live