कोकण आणि गोवाच्या किनारपट्टीवर 'तौत्के'चा धुमाकूळ..(पहा व्हिडिओ)

Tautkae Cyclone Havoc in Konkan and Goa
Tautkae Cyclone Havoc in Konkan and Goa

मुंबई : तौत्के चक्री Tautkae Cyclone वादळ मालवण Malvan किनारपट्टीवर धडकल्यानंतर या वादळाने कुणकेश्वर, देवगड जोरदार तडाखा दिला आहे. त्यानंतर चक्रीवादळ रत्नागिरी दिशेने सरकू लागले आहे. लाटांची तीव्रता जरी कमी झाली तरी वाऱ्याचा वेग उद्यापर्यंत कायम राहणार आहे. ताशी ९० ते १२० किलोमीटर किलोमीटर वेगाने वारे वाहताना पाहायला मिळत आहे.  या चक्री वादळामुळे अनेक राज्य मार्ग State Highway झाडे पडून ठप्प झाले होते आणि काही जणांच्या घरची झाडे कोसळून मोठं नुकसान झालं आहे. Tauktae Cyclone Effect in Konkan Belt and Goa

तौत्के चक्रीवादळ सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळपासून घोंगावत होत.आता हे चक्रीवादळ रत्नागिरीच्या Ratnagiri दिशेने सरकताना दिसत आहे. आज आणि उद्या या चक्री वादळाचा तीव्रता सिंधुदुर्गात पण जाणवणार आहे.  रेडी ते विजयदुर्ग या १२० किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील ७० ते ८० घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यात ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडं पडल्यामुळे बंद आहेत.

घाटात दरडी कोसळल्या
घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात १०० ते ११० घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळ घोंगावत आहे. उद्याही जिल्ह्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व समुद्र खवळलेला राहील. जिल्ह्यात रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तौत्के चक्रीवादळामुळे वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. Tauktae Cyclone Effect in Konkan Belt and Goa

अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळामुळे गोव्याला अक्षरशः झोडपून काढले आहे गोव्यात मोठ्या प्रमाणामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू असून ठीक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे याशिवाय झाडे पडण्याच्या अनेक घटनांमुळे घरांवर ती पडल्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाला आहे सध्या सर्व प्रकारच्या टीम अलर्ट असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत यात मरीन पोलीस , जीव रक्षक , एनडीआरएफ, कोस्ट गार्ड यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे पडलेले झाड काढण्याचं काम सुरू असून अग्निशामक दलाकडून काढण्याचा सुरू असून यासाठी एनडीआरएफचे जवान सुद्धा मदत करत आहेत
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com