नांदेडच्या 'पदवीधर नाश्ता सेंटर'ने निर्माण केला आदर्श!

Two Graduate Youth in Nanded started Breakfast Centre
Two Graduate Youth in Nanded started Breakfast Centre

नांदेड : आज प्रत्येकजण कोरोना Corona संसर्गा पासून जिव वाचविण्याची धडपड सुरू असतानाच लाॅकडाऊन Lock Down काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. नांदेडच्या Nanded भावी इंजिनिअर आणि एका पदवीधर Graduate असलेल्या तरुणांनी लाॅकडाऊन मुळे नोकरी मिळत नसल्याने चक्क चहा आणि नाष्टा सेंटर सुरू करुन एक आदर्श निर्माण केलाय. Two Graduate Youth in Nanded started Breakfast Centre

या उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांनी 'पदवीधर' चहा, नाश्ता सेंटर असं नाव आपल्या टपरीला दिलयं. प्रकाश नारनवरे आणि बालाजी पोकले या दोन उच्च शिक्षित तरुणांनी बेरोजगारीचे नैराश्य बाजूला ठेवून पदवीधर नावानं चहा, नाश्ता  सेंटर उघडलयं. या परिसरात आता हे पदवीधर चहा नाश्ता सेंटर प्रसिद्ध झालंय.

हे देखिल पहा - 

पाॅलेटेक्निक मधून प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेला प्रकाश नारनवरे आणि पदवीधर असलेला बालाजी पोकले या दोन तरुण मित्रांनी नौकरी साठी अनेक प्रयत्न केले. मात्र, दीड वर्षांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे नोकरी मिळाली नाही. 

त्यामुळे दोघांनी सुरवातीला दोन ठिकाणी चहा, नाश्ता सेंटर सुरू केले. मात्र, दोन्ही ठिकाणी हे सेंटर फारसे चालले नाही. दोघांनीही हार न मानता  जिद्द सोडली नाही. कर्ज काढून गोकुळ नगर मध्ये पदवीधर चहा, नाश्ता सेंटर नावानं टपरी सुरू केली आणि आता ही टपरी चांगली चालू लागली आहे. त्यामुळे आता हे दोघे आनंदी आहेत. Two Graduate Youth in Nanded started Breakfast Centre

कोरोनामुळे लागू झालेल्या लाॅकडाऊन मुळे नैराश्य न बाळगता या दोन तरुणांनी सुरू केलेला हा छोटासा व्यवसाय आज कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च भागवतोय. बालाजी आणि प्रकाश या दोन तरुणांनी परिस्थिती वर केलेली मात इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com