मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट केवळ राजकीय तडजोडी साठीच - उदयनराजे भोसले  

ओंकार कदम
मंगळवार, 8 जून 2021

सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांन बरोबर उदयनराजे भोसले यांनी बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकी नंतर उदयनराजे भोसले यांना उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्या भेटी बाबत विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली आहे. 

सातारा  -  सातारा Satara येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांन बरोबर उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकी नंतर उदयनराजे भोसले यांना उद्धव ठाकरे Uddhav Thackrey आणि पंतप्रधान यांच्या भेटी बाबत विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली आहे. Udayan Raje Bhosale has criticized Uddhav Thackeray

मराठा आरक्षण: पंतप्रधानांनी ऐकून घेतले, आश्वासन मात्र काही नाही

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट  दिल्ली Delhi मध्ये जाऊन घेतली आहे. या भेटी बाबत उदयनराजे भोसले यांनी खळबळजनक विधान केले असून आजची भेट ही केवळ राजकीय तडजोडी साठी झालेली भेट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी या वेळी केला आहे.

हे देखील पहा -

भेटी आधी अधिवेशन बोलावणे आणि त्या अधिवेशनात चर्चा होणे गरजेचे होते ते  का झाले नाही असा सवाल देखील उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला. ही भेट म्हणजे घेवाण देवाणी मधून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

 


संबंधित बातम्या

Saam TV Live