उल्हासनगरमध्ये रुग्णांना मिळणार कृत्रिम ऑक्सिजन

अजय दुधाणे
मंगळवार, 18 मे 2021

शहरात कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेकांना अजूनही श्वास घ्यायला त्रास होत असून,  त्यामुळे या रुग्णांसाठी घरच्या घरी कृत्रिम ऑक्सिजन पुरवणारी मशीन उपलब्ध झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून अशा 15 मशीन्स अंबरनाथकरांना देण्यात आल्या आहेत.

उल्हासनगर - शहरात कोरोनातून Corona बऱ्या झालेल्या अनेकांना अजूनही श्वास घ्यायला त्रास होत असून अशा रुग्णांना जास्त दिवस कोविड केअर Covid Center सेंटरमध्ये दाखल करून ठेवणं हे योग्य नसतं. त्यामुळे या रुग्णांसाठी घरच्या घरी कृत्रिम ऑक्सिजन Artificial oxygen पुरवणारी मशीन उपलब्ध झाली आहे. खासदार MP श्रीकांत शिंदे  फाउंडेशन Shrikant Shinde Foundation यांच्या माध्यमातून अशा 15 मशीन्स अंबरनाथकरांना Ambarnath देण्यात आल्या आहेत. In Ulhasnagar patients will get artificial oxygen

उल्हासनगर शहरात आत्तापर्यंत हजारो रुग्ण कोरोनातून बरे झाले असून यापैकी अनेकांना कोरोना बरा झाल्यानंतर सुद्धा काही दिवस ऑक्सिजनची गरज भासत असते. मात्र अशा रुग्णांना कोरोना हॉस्पिटलमध्ये फार दिवस दाखल करून ठेवणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देताना घरी ऑक्सिजनची व्यवस्था करा, असा सल्ला डॉक्टरांकडून Doctor दिला जातो. मात्र घरच्या घरी ऑक्सिजन सुविधा घेण्यासाठी दिवसाला अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो.

हे देखील पहा -

त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने खास कॅलिफोर्निया हून California जवळपास 120 ऑक्सिजन मशीन मागवल्या आहेत. या सर्व मशीन संपूर्ण ठाणे Thane जिल्ह्यात वितरित करण्यात आल्याअसून यापैकी 15 मशीन उल्हासनगर Ulhanagar शहराला देण्यात आल्या आहेत. In Ulhasnagar patients will get artificial oxygen

बीडमध्ये एचआरसीटी केंद्राकडून अव्वाच्या सव्वा लूट; वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलनाचा इशारा 

या मशीन थेट हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करून रूग्णाला ऑक्सिजन पुरवणार आहेत. यामुळे रुग्णांचा आर्थिक भार हलका होणार आहे. आज उल्हासनगर शिवसेना Shivsena शहर शाखेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे ,अरुण आशान यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Edited By- Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live