एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू

रोहिदास गाडगे
शुक्रवार, 14 मे 2021

शिरुर तालुक्यातील बाभुळसर गावात एकाच कुटुंबावर कोरोनाचा आघात होऊन एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

पुणे : शिरुर Shirur तालुक्यातील बाभुळसर गावात एकाच कुटुंबावर कोरोनाचा Corona आघात होऊन एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा Two Brothers कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू Death झाल्याची धक्कादायक घटना घडली आहेUnfortunate Death of Two Brothers Due To Covid On Same Day

दोन भावांच्या मृत्युमुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विठ्ठल भगवान नागवडे वय ६५, सुभाष भगवान नागवडे वय ५९ अशी कोरोनाने मृत्यु झालेल्या दोन भावांची नावे आहे.

हे देखील पहा -

मागील पंधरा दिवसापुर्वी बाभुळसर गावातील नागवडे  कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला यामध्ये दोन सख्ख्या भावांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी दोघांनाही वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मात्र उपचारादरम्यान एका भावाचा मृत्यु झाल्याची बातमी समजताच दुस-या भावाचाही मृत्यु झाला आहे. Unfortunate Death of Two Brothers Due To Covid On Same Day

'सकाळ'चे बातमीदार संदीप जगदाळे यांचे निधन

 

शिरूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचे संकट भीषण झाले आहे.  यातुन कोरोनाचा समुह संसर्ग होऊन ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By  : Krushna Sathe  


संबंधित बातम्या

Saam TV Live