आशियातील 'हे' गाव आहे जुळ्या मुलांचे गाव; शास्त्रज्ञही हैराण

kodinhi.jpg
kodinhi.jpg

जगभरात जुळी Twins अपत्ये जन्माला येणे ही बाब अत्यंत सामान्य आहे. शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन Fertilization केल्यावर जुळी बाळे जन्माला येतात.  त्याला द्वियुग्मज जुळे असे म्हटले जाते. हे जुळे सामान्यत: भिन्न लिंगी असतात. मात्र ही प्रक्रिया अत्यंत दुर्मिळ आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का भारतात असे एक गांव आहे ज्या ठिकाणी जुळी अपत्ये जन्माला येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे गाव आहे केरळमधील Kerala कोडीन्ही Kodinhi गाव. या गावात आतापर्यंत 550 पेक्षा जास्त जुळ्या व्यक्तींच्या जोड्या जन्माला आल्या आहेत. या विशेष बाबी मुळे आता कोडीन्ही गावाला 'जुळयांचे गाव' म्हणूनही ओळख मिळाली आहे.  (This is a village of twins in Asia Scientists are also perplexed) 

- हे गाव वेगळे का आहे?
भारतातील हे गाव केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात कोडीन्ही गाव आहे.  या गावात नवजात मुलापासून 65 वर्षांपर्यंतचे लोक जुळे आहेत.  जागतिक स्तराविषयी सांगायचे तर, प्रत्येक 1000 मुलांमध्ये 4 जुळी अपत्ये  जन्माला येतात, परंतु या गावात प्रत्येक 1000 मुलांमध्ये 45  जुळी मुले जन्माला येतात.  जुळी मुळे जन्माला येण्याच्या बाबतीत संपूर्ण जगात कोडीन्ही गाव  दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आशिया खंडात  हे गाव पहिल्या क्रमांकावर आहे. कोडिन्ही गाव हे मुस्लिम बहुल गाव आहे. वर्ष  2008 या एका वर्षात या गावात 300  मुलांपैकी 15 जुळी मुले जन्माला आली.  मोठी गोष्ट म्हणजे या गावात शाळा असो किंवा बाजार असो, सर्वत्र जुळी मुले दिसतात.

 - गेल्या 10 वर्षात जुळ्या मुलांच्या जन्मदरात वेगाने वाढ 
गावातल्या जुळ्या मुलांचा जन्म सुमारे 70 वर्षांपूर्वी सुरू झाला, असे  गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या गावातील सर्वात जुने जुळी अपत्ये 65 वर्षांची आहेत. अब्दुल हमीद आणि त्यांची जुळी बहीण कुणी कडिया हे दोघे 65 वर्षांचे आहेत. यानंतरच  गावात जुळ्या मुलांच्या जन्माला सुरुवात झाली असे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.  त्यानंतर गेल्या काही वर्षात याठिकाणी जुळी मुळे जन्माला येण्याचे प्रमाण कमी झाले होते, मात्र गेल्या दहा वर्षात पुनः एकदा जुळ्या मुलांचे प्रमाण वाढले असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. 

- जुळी मुळे जन्माला येण्याचे कारण काय आहे? 
या गावात इतक्या जुळ्या मुलांच्या जन्माचे कारण डॉक्टरांनाही  अद्याप समजू शकलेले नाही. गावातल्या ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या खाण्याच्या सवयीमुळे या गावात जुळे मुले जन्माला येत असावीत, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. पण नंतर हा अंदाज नाकारण्यात आला. कारण या खेड्यातील लोकांचे खाणपान  केरळमधील इतर गावांसारखेच होते आणि यात काही फरक नव्हता. परंतु आतापर्यंत गावात जुळे जन्म देण्याचे कारण डॉक्टरांनाही  सापडलेले नाही.

-घर, शाळा, बाजार जिथे पाहावं तिथे जुळी मुलेच 
गावात जुळ्या जुळ्या संख्येमुळे गावकरी खूप  त्रस्त आहे. याहून  सर्वात कठीण गोष्ट शाळेत, शाळेत जुळ्या मुलांना ओळखण्यास शिक्षकांनाही खूप अडचणी येतात. याबाबत गंभीर गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट अशी आहे की जर या जोड्यांपैकी एखादा आजारी पडला तर दुसराही आजारी पडतो.  जुळ्या मुलांच्या बाबतीत कोडिन्ही गाव जगभरात खूप लोकप्रिय आहे. जगभरातील अनेक मीडिया हाऊसेसही या गावात आली आहेत. इतकेच नाही तर परदेशातूनही अनेक शास्त्रज्ञ या गावात संशोधन करण्यासाठी आले आहेत. मात्र त्याही अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. 

Edited By - Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com