Viral | माचिसच्या गंधकाने विंचवाचं विष उतरतं ?

संदीप चव्हाण
शनिवार, 7 मार्च 2020

विंचू चावला तर किती वेदना होतात ते ज्यांना विंचू चावला त्यांना कळालं असेल.पण, विंचू चावल्यास विष उतरवायचं कसं या आशयाचा मेसेज व्हायरल होतोय.असे कोणतेही उपचार करून विंचवाचं विष उतरवणं शक्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. 

विंचू चावला की वेदना किती त्रासदायक असतात ते सांगायला नको.पण, सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकजण काहीना काही उपचार सांगत असतात.विंचू चावला तर विंचवाचं विष उतरवण्यासाठी काय करायला हवं ते सांगणारा मेसेज व्हायरल होतोय.त्या मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा.

 

  • काय आहे व्हायरल मेसेज ?
  • विंचू चावला तर पाच ते सात माचिस काडीचा गंधक मसाला पाण्यात टाकायचा.दोन्ही मिश्रण एकत्र करून विंचू चावलेल्या जागी लावल्यास 2 मिनिटात आराम मिळतो.

हे ही वाचा : टिकटॉकचं सॉल्ट चॅलेंज घेईल तुमचा जीव ?

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली.विंचू चावल्यावर त्याच्या वेदना असह्य असतात.त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.पण, खरंच गंधक आणि मसाला पाण्याचं मिश्रण लावल्याने विंचवाचं विष उतरतं का ? याची पडताळणी करण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं डॉक्टरांशी संपर्क साधला.त्यांना हा व्हायरल मेसेज दाखवला आणि विंचू चावल्यास माचिसच्या गंधकाचा उपचार केल्यास आराम पडतो का ? त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा.

 

  • काय आहे व्हायरल सत्य?
  • माचिसचं गंधक आणि मसाल्याचं पाणी एकत्र करून लावल्यास विष उतरत नाही
  • माचिसचं गंधक लावल्याने विंचू चावलेल्या जागी काहीही फरक पडत नाही
  • विंचू चावल्यास वेदना कमी होण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा 

व्हिडीओ पाहा ः  विंचू चावल्यास माचिसच्या गंधकाचा उपचार?

असे मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकजण घरच्या घरीच प्रयोग करतात.पण, त्याने काहीच फरक पडत नाही.त्यामुळं असे उपचार करून वेळ वाया घालवू नका.विष उतरवण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आमच्या पडताळणीत विंचू चावल्यास माचिसचं गंधक आणि मसाल्याचं पाणी एकत्र करून लावल्यास आराम मिळतो हा दावा असत्य ठरला.

web title : Viral satya match stick powder cure scorpion bite 


संबंधित बातम्या

Saam TV Live