Viral | पिल्लांसाठी खारुताई कोब्राशी लढली !

संदीप चव्हाण
शनिवार, 14 मार्च 2020

आई आणि मुलांचं नातं किती घट्ट असतं हे सगळ्यांनाच माहित आहे.याचाच प्रत्यय एका व्हिडीओतून समोर आलाय.कोब्रा खारुताईच्या पिल्लांवर हल्ला करत असल्याने खारुताई लढत होती.नक्की पुढे काय झालं वाचा सविस्तर.

आई आणि मुलाचं नातं काय असतं ते सांगायला नको.त्या दिवशी खारुताई आपल्या पिल्लांसोबत खेळत होती.त्याचवेळी या कोब्राची नजर खारुताईच्या पिल्लावर पडली.कोब्रा पिल्लांकडे जाण्याचा प्रयत्न करत होता.पण, ही खारुताई या कोब्राला नडत होती.स्वत:चा जीव धोक्यात घालून कोब्राला पळवून लावण्याचा प्रयत्न करत होती.पण हा कोब्रा खारुताईवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय.

हे ही वाचा : कोरोनामुळे माकडांवर उपासमारीची वेळ

कोब्रा खारुताईच्या पिल्लांना खाण्याचा प्रयत्न करत होता.त्यावेळी या खारुताईनं पिल्लांना वाचवण्यासाठी कोब्रावर तुटून पडली.या कोब्राला ती पळवून लावत होती.पण, कोब्रा हल्ला करत असल्याने खारुताई आणि पिल्लं संकटात होती.कोब्रा पिल्लांवर हल्ला करेल म्हणून खारुताई चिडली होती.अंगातली ताकद पणाला लावून ती क्रोबाशी भिडत होती.बराचवेळ झाला तरीही कोब्रा मागे हटत नव्हता.अखेर खारुताईचं हे धाडस पाहून व्हिडीओ बनवणाऱ्यांनेच या कोब्राला पळवून लावलं आणि या खारुताईचा आणि तिच्या पिल्लांना जीवदान मिळालं.

व्हिडीओ पाहा :  पिल्लांसाठी खारुताई कोब्राशी लढली!

व्हिडीओ साऊथ आफ्रिकेच्या कलगादी ट्रासफ्रंटियर पार्कमधील आहे.पार्कमधील सफारी गाईड डेव पुसे यांनी हा व्हिडीओ शूट केलाय.व्हिडीओतून आई आपल्या पिल्लांसाठी जीवही देऊ शकते हे या घटनेतून सिद्ध झालंय.व्हिडीओ आता व्हायरल होत असून, आई आणि पिल्लांचं प्रेम यातून दिसून येतंय.

web title : viral satya squirrel battles cobra to protect her babies


संबंधित बातम्या

Saam TV Live