Women Viral Video : रेल्वेत टीसीने विचारलं तिकीट कुठेय? महिलेच्या उत्तराने मन जिंकलं

Railway Viral Video : महिलेसोबत ती शेळ्या आणखी एक व्यक्तीही होती.
Women Viral Video
Women Viral VideoSaam TV

Viral Video :

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांची संख्या मोठी आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे दरवर्षी कोट्यवधीची दंडवसुली करते. एकीकडे ही स्थिती असताना रेल्वेतील एका महिला प्रवाशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनालाही मनोमनी वाटेल की सगळे प्रवासी असेच असावेत.

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रामाणिक महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झालं असं की, व्हिडीओत दिसणारा महिला आपल्या तीन शेळ्यांसह ट्रेनमधून प्रवास करत होती. तेव्हा तिथे पोहोचलेल्या टीटीईने तिच्याकडे तिकीट कुठे आहे? अशी विचारणा केली. यावर महिलेने दिलेल्या उत्तराने सर्वांचच मन जिंकलं. (Viral VIdeo)

Women Viral Video
Wedding Viral Video : मटनावरून लग्नात तुफान राडा; खुर्च्या, प्लेट मिळेल त्याने पाहुण्यांनी एकमेकांना धू धू धुतलं...!

महिलेसोबत ती शेळ्या आणखी एक व्यक्तीही होती. टीटीईने तिकीट विचारणा केल्यानंतर महिलेने तिन्ही बकऱ्यांसाठीही तिकिटे काढल्याची माहिती दिली. तसेच तिने टीटीईला काढलेलं तिकीटही दाखवलं. महिलेचा प्रामाणिकपणा पाहून टीटीईच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य फुललं.

Women Viral Video
Viral Video: बसमध्ये लागली डुलकी; डोक्यावरच आपटला, VIDEO पाहाल तर हसावं की रडावं कळणारच नाही!

अवघ्या 22 सेकंदाचा हा  व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डी प्रशांत नायर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर लोक प्रचंड लाईक्स आणि कमेंटही करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com