साथी हाथ बढाना..म्हणत गावाने उभे केले कोसळलेले वीजेचे खांब (व्हिडिओ)

चेतन इंगळे
मंगळवार, 25 मे 2021

वैतरणा हे गाव पूर्ण पणे शेतकामावर अवलंबून आहे.त्यामुळे त्यामुळे या गावातील अधिकतर जमीन शेतकामा निमित्त वापरली जाते. त्यामुळे महावितरणचे विद्युत पुरवठा करणारे खांब हे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये लावण्यात आले आहेत

विरार : तौत्के चक्रीवादळाच्या Tauktae Cyclone तडाख्यात वैतरणा Vaitarna परिसरातील वीज पुरवठा Electricity Supply सेवेला मोठा फटका बसला आहे. आठ दिवस उलटूनही अनेक गावे ही अजुन अंधारातच आहेत. ग्रामीण भागात बहुतांशी विजेचे खांब हे शेत जमिनीत उभे आहेत व त्यातील कोलमडून पडलेली अनेक खांब हे अगदी अडचणीच्या ठिकाणी असल्याने दुरुस्तीच्या कामांना मोठी अडचण निर्माण होत आहे. Virar Residents Re Erecting Electric Polls after Tauktae Cyclone

यासाठी महावितरण कर्मचा-यांच्या सोबत असंख्य ग्रामस्थांच्या सहकार्याचा हातभार लागून अनेक दुरुस्तीची कामे ही सध्या सुरु आहेत.  त्यानुसार वैतरणा गावातील काही विभागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर काही भाग हे आठ दिवस उलटूनही अजून अंधारातच आहेत. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून हवी ती मदत महावितरणला करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित गावाचा लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.

तर राजभवनात पेढे वाटू - संजय राऊत

वैतरणा हे गाव पूर्ण पणे शेतकामावर अवलंबून आहे.त्यामुळे त्यामुळे या गावातील अधिकतर जमीन शेतकामा निमित्त वापरली जाते. त्यामुळे महावितरणचे विद्युत पुरवठा करणारे खांब हे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये लावण्यात आले आहेत. Virar Residents Re Erecting Electric Polls after Tauktae Cyclone

तौत्के चक्रीवादळामुळे वैतरणा गावातील शेतीला मोठा नुकसान झाले असले तरी,वीजपुरवठा देखील आठ दिवस खंडीत झाला आहे. त्यामुळे गावातील सर्व लोकांनी मिळून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करतस गावातील शेतजमीन मधिल विद्युत खांब लावण्यात मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live