कन्यारत्नाच्या जन्मानंतर माप ओलांडून गृहप्रवेशाने केले स्वागत

Mahesha Laad's  Daughter
Mahesha Laad's Daughter

सांगली - सध्या कोरोनामुळे (Corona) सर्वत्र नकारात्मक आणि निराशावादी चित्र असताना सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल येथे मात्र पुरोगामी विचारांच्या महेश लाड (Mahesha Laad) आणि त्यांच्या कुटूंबियांनी मात्र मुलीच्या जन्माचे स्वागत माप ओलांडून गृहप्रवेशाने केले आहे. या अनोख्या पद्धतीने स्वागत करत त्यांनी समाजाला अडचणीच्या काळात सकारात्मक विचारांचा संदेश दिला आहे. (Welcome to the celebration done after the birth of the girl)

कुंडल येथील शेतकरी महेश लाड यांना नुकतेच कोरोनाच्या काळात कन्यारत्न झाले आहे. त्यांनी बाहेरील वातावरणामूळे घाबरुन न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योग्य ती खबरदारी घेतली. आजही मुलगी म्हंटल की समाजातील अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात. आजही नवजात अर्भके दगावणे अथवा टाकून दिली जातात त्यात मुलींचे प्रमाण जास्त आहे.

हे देखिल पहा - 

समाजाचा मुलींच्या बाबतीतला नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मकता यावी यासाठी महेश लाड यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर मुलीला सजवलेल्या गाडीतून घरी आणले. तर अंगणात रांगोळी काढली, फुलांच्या गालीचा अंथरला होता. तर संपूर्ण घर फुलांच्या माळांनी सजवले होते.

सर्वसाधारण आपल्याकडे मुली लग्न झाल्यानंतर सासरी जाताना भरलेले माप ओलांडून घरात प्रवेश करतात. याचा हेतु म्हणजे नवीन मुलीने लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश करावा असा असतो. आपल्या संस्कृतीनेही मुलीला "लक्ष्मी" मानले असून तोच दृष्टीकोन समोर ठेऊन या उभयतांनी मुलींचा प्रवेश ही माप ओलांडून  केल्याने लाड कुटूंबियांनी "मुलगी नको"  म्हणणाऱ्यांसमोर एक आदर्श उदाहरण  दिले आहे. 

Edited By - Puja Bonkile

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com