नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही, सर्वसामान्यांना बजेटमधून काय मिळालं?

साम टीव्ही
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

 

  • नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही
  • कराची सवलत जैसे थे
  • निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र मोठा दिलासा 

केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांसाठीच्या करात कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे नोकरदार वर्गातून काहीसा नाराजीचा सूर उमटलाय. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या करदात्यांना मात्र, सवलत देण्यात आलीय. 

2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालाय. मात्र हा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे ज्यात नोकरदारांसाठीच्या कराबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. याशिवाय प्रत्यक्ष करातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात नव्या कररचनेची घोषणा करण्यात आली होती. 

 

वाचा, दशकातल्या पहिल्या अर्थसंकल्पाने शेतीला काय दिलं? या घोषणांच्या पेरणीमुळे शेती क्षेत्र बहरणार का?

यानुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करातून सवलत देण्यात आली होती. यापुढे 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आणि 5 ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारणीची घोषणा करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी कररचनेत बदल न गेल्यानं जुनी कररचनाच कायम राहणारंय. 

पाहा नोकरदार काय म्हणाताय?

 यंदाच्या अर्थसंकल्पातअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांना मात्र मोठा दिलासा दिलाय. 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या करदात्यांना यापुढे इनकम रिटर्न भरणं गरजेचं असणार नाही. ज्यांच्या उत्पन्नाचा मार्ग केवळ पेन्शन आहे. त्यांचा कर त्यांच्या उत्पन्नातूनच वजा केला जाईल. 

 यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी देण्यात आला असला तरी इंधनावरील सेस आणि जुन्याच करप्रणालीमुळे सर्वसामान्य तसच नोकरदारांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live