White Fungus - पांढऱ्या बुरशीमुळे महिलेच्या आतड्याला पडले छिद्र , डॉक्टर झाले हैराण

साम टीव्ही ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

पांढऱ्या बुरशीमुळे White fungus कोरोना संसर्गादरम्यान या महिलेच्या आतड्याला छिद्र  Intestine Hole पडल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली -  देशात कोरोना संसर्गाच्या  दुसऱ्या लाटेने Corona Second Wave थैमान घातले आहे. दरम्यान काळी बुरशी Black fungus, पाढंरी बुरशी White fungus तसेच  पिवळी बुरशी Yellow fungus यांनी सरकारच्या चिंतेत भर टाकली आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील Sir Gangaram Hospital पांढऱ्या बुरशीच्या एका महिलेला पाहून डॉक्टर Doctor देखिल हैराण झाले. पांढऱ्या बुरशीमुळे White fungus कोरोना संसर्गादरम्यान या महिलेच्या आतड्याला छिद्र  Intestine Hole पडल्याची माहिती समोर आली आहे. 

हे देखिल पहा - 

 

दिल्ली रुग्णालयातील 'इन्सिट्यूट ऑफ गस्ट्रोअँट्रोलॉजी अँड पेनक्रिएटिकोबिलेरी सायन्सेस' चे अध्यक्ष डॉ. अनिल अरोडा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  कोरोना विषाणू संसर्गात  पांढऱ्या बुरशीची अशी घटना प्रथमच समोर आली आहे. कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णामध्ये पांढऱ्या बुरशीमुळे अन्ननलिका, लहान आतडे आणि मोठ्या आतड्याला छिद्र असलेला रुग्ण यापूर्वी कधी आढळलेला नाही असे अरोडा यांनी म्हंटले. 

49 वर्षीय महिलेच्या पोटात दुखत होते. तिला उलट्या आणि बद्धकोष्ठतेचा देखिल त्रास हॉट होता. यामुळे तिला 13 मे रोजी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या वर्षी स्तन कर्करोगामुळे या महिलेचे स्तन काढण्यात आले होते. तसेच त्या महिलेवर चार आठवड्यापूर्वी केमोथेरेपी करण्यात आली होती.

त्या महिलेच्या पोटाचा सिटी स्कॅन केल्यास पोटात पाणी आणि हवा असल्याचे आढळले. आतड्याला छिद्र पडल्यास अशी परिस्थिति निर्माण होते. दुसऱ्या दिवशी त्या महिलेवर शस्त्रक्रिया पार पडली. तेव्हा अन्ननालिकेच्या खालच्या भगत देखिल छिद्र आढळले. लहान आतड्याच्या भागात गँगरीन झाल्यामुळे तो भाग काढण्यात आला, असे डॉ. अरोडा यांनी माहिती दिली आहे.  

Yellow fungus infection : काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी जास्त...

कोविड-19 सकारात्मक आढळलेल्या महिलेच्या शरीरात अँटीबॉडी मोठ्या प्रमाणात आढळुन आले होते. बुरशीची आजार समोर आल्यानंतर या महिलेला अँटी फंगल औषधं देण्यात आले होते. सध्या या महिलेची स्थिति चांगली आहे अशी माहिती  डॉक्टरांनी दिली आहे. 

 

 

Edited By - Puja Bonkile


संबंधित बातम्या

Saam TV Live