'या' शहरातून दिसणार या वर्षीचे दुर्मिळ सूर्यग्रहण

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

कंकणाकृती सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 1.42 मिनिटांनी सुरू होणार आहे.

2021 चे पहिले सूर्यग्रहण Solar Eclipse आज दिसणार आहे. तसेच हे या वर्षातील दुसरे ग्रहण आहे. यापूर्वी 26 मे रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या पूर्वीच अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये दिसणार आहे. सूर्यग्रहण भारताच्या अनेक भागातून दिसणार नाही. हे पूर्ण सूर्यग्रहण असले तरीसुद्धा भारतात ते अर्धवट रूपात दिसणार आहे. (This year's rare solar eclipse will be seen from the same city)

कंकणाकृती सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 1.42 मिनिटांनी सुरू होणार आहे. तसेच संध्याकाळी 6.41 मिनिटांनी संपणार आहे. अरुणाचल प्रदेशमधील दिबंग वन्यजीव अभयारण्य जवळून संध्याकाळी 5.52 मिनिटांनी हे सूर्यग्रहण पाहता येणार तसेच लडाखच्या उत्तर भागात संध्याकाळी 6 च्या सुमारास पाहत येणार आहे. 

हे देखील पहा - 

या वर्षातील हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, उत्तर कनेडा, युरोप, आशिया आणि रशियाच्या अनेक भागांतून दिसणार आहे. उत्तर अमेरिका,युरोप, आणि उत्तर आशियाच्या अनेक भागात अर्धवट रूपात सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार या वर्षातील सूर्यग्रहण 148 वर्षानी जेष्ठ अमावस्येला पाहायला मिळणार आहे. 10 जून म्हणजेच गुरुवारी हे सूर्यग्रहण लागणार आहे. 

कोव्हिड सेंटरमध्ये रात्री नऊनंतर नातेवाईकांना प्रवेश बंद 

ग्रहण पाहताना आवश्यक ती काळजी घ्यावी. ग्रहण पाहतांना भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेल्या गॉगल्स मधूनच पहावे. तसेच ग्रहण पाहतांना तुम्ही सूक्ष्म-छिद्र असलेल्या कॅमेरामधून पाहू शकता. तसेच गहू चाळायच्या घरगुती पद्धतीचा वापर करू शकता. ग्रहणाच्या वेळी ही चाळणी काही अंतरावर एका पाढऱ्या सपाट कागदावर धरावी.  तसेच गंमत म्हणजे चाळणीला जेवढी छिद्रे आहेत ठेवधे छोटे सूर्य दिसतात.   

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live