तुमचा मोबाईल नंबर आता होणार 11 अंकांचा...!

साम टीव्ही
शनिवार, 30 मे 2020

 आता तुमचा मोबाईल नंबर ११ अंकांचा होऊ शकतो, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियानं शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला. ज्यात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरण्याच्या सूचना केल्यात, ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरल्यानं अधिकाधिक मोबाईल क्रमांकांची उपलब्धता देशात होऊ शकेल. १००० कोटी मोबाईल नंबरची क्षमता ११ अंकी मोबाईल नंबर झाल्यामुळे उपलब्ध होईल.

मुंबई : आता तुमचा मोबाईल नंबर ११ अंकांचा होऊ शकतो, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियानं शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला. ज्यात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरण्याच्या सूचना केल्यात, ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरल्यानं अधिकाधिक मोबाईल क्रमांकांची उपलब्धता देशात होऊ शकेल. १००० कोटी मोबाईल नंबरची क्षमता ११ अंकी मोबाईल नंबर झाल्यामुळे उपलब्ध होईल.

नियामकाने असेही सुचवले की लँड लाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य असणे आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त नवीन राष्ट्रीय क्रमांकाची योजना सुचविण्यात आली आहे. तसेच ट्रायने डोंगलसाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक १० अंकी वरून १३ अंकांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिलाय.

म्हणजे लवकरच आपला १० अंकी मोबाइल नंबर ११ अंकांचा होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत मोबाइल फोन ग्राहकांची वाढती संख्या पाहता ट्राय काही वर्षांपासून या प्रस्तावावर विचार करतंय.  दरम्यान देशात लवकरच लागू करण्यात येईल असा अंदाज आहे. 

हे ही वाचा

देशात आता 30 जूनपर्यंत लॉकडाऊन, वाचा काय आहेत नवीन लॉकडाऊनच्या नियमावली...


संबंधित बातम्या

Saam TV Live