Nanded News: नुकसानीच्‍या पंचनाम्‍यांना विलंब; शेतकरी आर्थिक संकटात

नुकसानीच्‍या पंचनाम्‍यांना विलंब; शेतकरी आर्थिक संकटात
Nanded News
Nanded NewsSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्‍ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासुन आवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. पाऊस, गारा आणि वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तरी देखील (Nanded News) अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. यामुळे (Farmer) शेतकरी संकटात सापडला आहे. (Live Marathi News)

Nanded News
Accident News: अपघातस्‍थळी थांबलेल्‍या मामाला बसला धक्‍का; भरधाव ट्रकची मोटरसायकलला धडक

नांदेड जिल्‍ह्यात गेल्या २५ एप्रिलला जिल्ह्यात तुफान पाऊस (Rain) आणि गारपिट झाली होती. मात्र नुकसान होउन दहा दिवस उलटले तरी अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाही. नांदेड जिल्‍ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. केळी, पपई, आंबा, ज्वारी, हळद यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले. या भागात मात्र अजुनही पंचनामे सूरु झाले नाही.

Nanded News
Child Marriage: आष्टीत २ बालविवाह थांबविले; चाईल्ड लाईन आणि पोलिसांची कारवाई

साडेबारा हजार हेक्‍टरवर नुकसान

पंचनाम्याना विलंब होत असल्याने नुकसानीची तिव्रता दिसणार नाही. नंतर कमी नुकसान दाखवून कमी मोबदला दिला जाईल; अशी शेतकऱ्यांना भीती आहे. दरम्यान २५ एप्रिलला झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्‍याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सद्या ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले. येत्या काही दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवनार असल्याचे जिल्हाधिकरी अभिजित राउत यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com