Nandurbar Papaya Crop Farmers: पपई उत्‍पादक शेतकऱ्यांसमोर संकट; मोर्केज, डावणी रोगांचा प्रादुर्भाव

Papaya Farmers Morcage, Incidence of Downy Diseases: पपई उत्‍पादक शेतकऱ्यांसमोर संकट; मोर्केज, डावणी रोगांचा प्रादुर्भाव
Nandurbar News Papaya Crop
Nandurbar News Papaya CropSaam tv

सागर निकवाडे

Nandurbar News: मागील दोन आठवड्यांपुर्वी नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर पपई उत्‍पादक (Farmer) शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. पपई पिकावर मोर्केज व डावणी रोगांचा प्रादुर्भाव झाल्‍यामुळे मोठे नुकसान होत आहे. त्‍यात पपईला भाव देखील नाही. (Tajya Batmya)

Nandurbar News Papaya Crop
Lemon Price: अबब..लिंबूच्या दराने तोंडचे पाणी पळाले; एका लिंबूसाठी मोजावे लागताय इतके रूपये

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमानात पपई पिकाचे लागवड केली जात असते. शेतकऱ्यांनी पपई लागवड केली असली तरी आता त्यांना वेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागतं आहे. अवकाळी पावसाचे आस्मानी संकट संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या पपई पिकावर मोजँक आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पपई उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. शिवाय पपईचा भावही कमी झाल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

Nandurbar News Papaya Crop
Cyber Crime: पॅनकार्डच्या नावाखाली दोघांची ऑनलाइन फसवणूक; ७५ हजारांचा ऑनलाइन गंडा

उन्हापासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पपईच्या फळावर क्रॉप कव्हर प्लास्टिकचा कागद त्यासारख्या जास्तीचा खर्च लावून फळांचा संरक्षण करावे लागत आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात मोर्केज रागाचा प्रादुर्भाव दिसून येत असून उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटनेचे चिन्ह आहेत. सध्या पपईच्या बागांवर पडलेल्या या असाध्य रोगांपासून अजून दोन महिने धोका असून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com