कस्तुरबामधील 'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही झालेला?

किरण खुटाळे
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याआधी हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला बळी मुंबई गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. 64 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोनाचा हा पहिली बळी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र वैद्यकीय तज्त्रांनी दिलेल्या माहितीमुळे आता या मृत्यूचं गूढ वाढलंय. 

 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर कस्तुरबा रुग्णालात उपचार सुरु होते. या रुग्णाचा मृत्यू मात्र कोरोनामुळेच झाला आहे, असं खात्रीलायकरीत्या सांगणं घाईचं होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही, तोवर या रुग्णाच्या मृत्यूबाबत बोलणं घाईचं ठरेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

 

कोरोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याआधी हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हा रुग्ण दुबईतून आला होते, याची माहिती आधी डॉक्टरांना नव्हती.  जेव्हा ही माहिती समोर आली, त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाची कोरोना चाचणी केली. त्यात या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. दरम्यान, या रुग्णाला हायपर टेन्शनचाही आजार होता, अशीही माहिती मिळतेय. या रुग्णाला आयसीयूत उपचार सुरु होते. 

 

पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आहे. ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. अखेर मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचं संशय व्यक्त करण्यात आलाय. तिचीही चाचणी सध्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून कऱण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्यात येतेय.  देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.

हेही वाचा - कोरोना वायरल उष्णतेत खरंच मरतो का?

हेही वाचा - कोरोनाला घाबरत असाल, तर हे वाचलंच पाहिजे!

हेही वाचा - कोरोना से डरोना, हे आहेत कोरोनापासून वाचण्याचे सोपे उपाय

 

पाहा VIDEO - 

 

 

corona virus first dead in maharashtra fact check marathi maharashtra government rajeh tope mumbai covid-19 international india patient health


संबंधित बातम्या

Saam TV Live