Aai Kuthe Kay Karte Daily Updates: ‘तीन मुलांची आई असूनही तू दुसरं लग्न?’ वीणाचा अरुंधतीला खोचक सवाल

Arundhati And Veena Conversation: सध्या तिच्या एन्ट्रीने सर्वांचीच डोकेदुखी झाली असून आजच्या भागात वीणा अरूंधतीसोबत तिच्या भूतकाळाबद्दल बोलत आहे.
Arundhati And Veena Conversation
Arundhati And Veena ConversationInstagram

Aai Kuthe Kay Karte Latest Update: ‘आई कुठे काय करते’ स्टार प्रवाहवरील या मालिकेने टीआरपीमध्ये बाजी मारली असून सध्या सर्वत्र याच मालिकेची चर्चा होत आहे. सलग दुसऱ्या स्थानावर असलेली ही मालिका प्रेक्षकांची नस ओळखण्यात कायम यशस्वी होत आहे. मालिकेत रोज नवनवीन ट्वीस्ट अनुभवयाला मिळत असून मालिकेत एका नव्या कॅरेक्टरची एन्ट्री झाली आहे. सध्या तिच्या एन्ट्रीने सर्वांचीच डोकेदुखी झाली असून आजच्या भागात वीणा अरूंधतीसोबत तिच्या भूतकाळाबद्दल बोलत आहे.

Arundhati And Veena Conversation
Actress Celebrate Baby Shower: दृश्यम फेम अभिनेत्री आई होणार! कपलचा क्युट व्हिडिओ व्हायरल

वीणाने घरात एन्ट्री घेताच तिच्या वडिलांचा बिझनेस अनिरूद्ध देशमुखसोबत सांभाळणार आहे. तो तिच्या सोबत बिझनेस पार्टनर म्हणून काम पाहणार असून आशुतोषचा व्यवसायातील व्याप बराच वाढला असल्यानं ती देखील काम पाहणार आहे. याकरिता अनिरुद्धचा तिनं रितसर इंटरव्ह्यू घेतला आहे, तेव्हाच त्याची निवड बिझनेस पार्टनर म्हणून केलीय. सुलेखाताईंच्या नणंदेची ती मुलगी असून त्या आपल्या मुलीप्रमाणेच तिला घरात वावगंत असतात. (Latest Entertainment News)

Arundhati And Veena Conversation
Anushka Sharma And Amitabh Bachchan Riding: विना हेल्मेट रायडिंग करणं बिग बींना आणि अनुष्काला भोवलं; मुंबई पोलिसांची कायदेशीर कारवाई

नुकताच शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, वीणा आजच्या एपिसोडमध्ये, अरुंधतीशी संभाषण करण्याचा प्रयत्न करते, सहज बोलताना, वीणा अरुंधतीला तिच्या आणि आशुतोषच्या लव्ह स्टोरीविषयी विचारते. मात्र तिच्या एका वाक्याने अरुंधतीला अवघडल्यासारखं होतं. वीणा अरूंधतीला विचारते, तू तीन मुलांची आई आहेस आणि अनिरुद्धसोबत २५-२६ वर्षांचा संसारही केला आहे. यावर अरुंधती तिला उत्तर देणं टाळते आणि आपण नंतर बोलू असं म्हणते. तरी देखील वीणा तिला प्रश्न विचारतेच.

आजच्या भागात वीणा अरूंधतीसोबत बोलताना, अनिरूद्धबद्दल चांगल्या गोष्टी तिच्या समोर बोलत असते. दरम्यान ती म्हणते, अनिरुद्ध खूप चांगला आहे. त्यानेच मला माझ्या व्यवसायात इथपर्यंतचा आत्मविश्वास दिला, त्यामुळे मी हा बिझनेस नक्की पुढे नेऊ शकते. त्यावर अरुंधती उत्तर देणं टाळते आणि खूप रात्र झालीय, झोपून घे. यावेळी जर भुतकाळाविषयी वीणा बोलत राहिली तर पुढच्या भागांमध्ये अरुंधतीची डोकेदुखी कमालीची वाढणार हे नक्की....

Arundhati And Veena Conversation
Shah Rukh Khan Launches Gauri Khan's Book: मन्नत कसं घडलं? बायको गौरीच्या बुक लाँचच्या वेळी शाहरुखने सांगितला हृदयस्पर्शी किस्सा

नुकतीच मालिकेत एन्ट्री केलेली वीणा अरूंधती- आशुतोषच्या जीवनात कशाप्रकारे डोकेदुखी होऊन राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनिरूद्धचा वापर करत ती कशाप्रकारे एकमेकांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते, हे सध्याच्या एपिसोड्समध्ये आपल्याला दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com