ShahRukh Khan Self Gift: पठान खुश हुआ! सिनेमाच्या यशानंतर शाहरुखने स्वतःला दिलं 'हे' महागडे गिफ्ट

ShahRukh Khan Buy Luxury Car: शाहरुख खानकडे अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.
Shah Rukh Khan Luxury Car
Shah Rukh Khan Luxury CarSaam TV

Shah Rukh Khan SelfGifted Luxurious Car: बॉलिवूडचा किंग खानने ४ वर्षणानी 'पठान' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसला. २५ जानेवारीला 'पठान' प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरू आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने जगभरात भरपूर कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या या यशामुळेच शाहरुखने नवीन कार खरेदी केली आहे.

शाहरुख खानकडे एकापेक्षा एक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. आता त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीची भर पडली आहे. पठानच्या यशानंतर शाहरुखने ही नवीन कार खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan Luxury Car
MM Keeravani: प्रवास आणि अतिउत्साह नडला.. ऑस्कर विजेते एमएम कीरावानी यांना कोरोनाची लागण

शाहरुख खानने रोल्स रॉयस कन्निनान ही खूप महागडी आणि लक्झरी कार विकत घेतली आहे. अभिनेत्याच्या फॅन क्लबने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरचा आहे.

मन्नतच्या आत एक रोल्स रॉयस कार शिरताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ रविवारी संध्याकाळचा आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर शाहरुखच्या कारची चर्चा सुरू झाली आहे. पठानच्या यशानंतर शाहरुख खानने स्वत:ला हे गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे.

कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार, या कारची एकूण किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जात आहे. शाहरुख खानच्या प्रत्येक वाहनाचा क्रमांक ५५५ हा एकच आहे. या कारवर 555 क्रमांक देखील लिहिलेला दिसतो.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाणमध्ये शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसत आहेत. तर डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

शाहरुख खान अॅटलीच्या 'जवान' आणि राजकुमार हिरानीच्या 'डंकी'मध्ये दिसणार आहे. याशिवाय शाहरुख सलमान खानच्या 'टायगर 3' मध्येही एक कॅमिओ करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com