
Amitabh Bachchan Arrested: सध्या बॉलिवूडचे शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. बिग बींनी रस्त्यावर एका अनोळख्या व्यक्तीची लिफ्ट मागितली आणि कमालीचे ट्रोल झाले. बिग बींनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. बिग बींनी हेल्मेट न घातल्यामुळे सोशल मीडियावर कमालीचे ट्रोल करण्यात आले.
मात्र आता या सर्व नाट्यानंतर मुंबई पोलिस बिग बींवर कारवाई करणार असल्याची चर्चा होत असताना बिग बींनी एक नवीन फोटो पोस्ट केलाय ज्याची चर्चा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
‘नो हेल्मेट’ राइडच्या वादानंतर, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर मुंबई पोलिसांच्या व्हॅनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये ‘ॲरेस्टेड’ असे लिहित पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या फोटोवर युजर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. फोटोमध्ये बिग बी उदास आणि थोडे टेन्शनमध्ये दिसत आहे. पोलिस व्हॅनसोबत फोटो पोस्ट केल्याने युजर्सकडून सोशल मीडियावर कमालीची चर्चा होत आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बिग बींच्या या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “सर, तुमच्या स्वॅगची बातच न्यारी आहे....” असं म्हणत कौतुक केले आहे, तर आणखी एक म्हणतो, “डॉन….. डॉन….. डॉन……. डॉन का इंतजार तो ११ पुलिस कर रही है! लेकीन डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नमुमकिन है!” तर आणखी एक म्हणतो, “आखिरकर डॉन को मुंबई पोलिस ने पकड लिया” अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी बिग बींचे कौतुकही केले असून ट्रोलिंग देखील केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी मागच्या सीटवर एका अनोळखी व्यक्तीचा बाईक चालवत असल्याचा फोटो पोस्ट केला होता. पण तो अनोळखी व्यक्ती नसून त्यांनी एका शूटिंग स्पॉट बॉय सोबत प्रवास केला होता. बिग बींनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “धन्यवाद मित्रा बाईक राईडसाठी. तुला माहित नाही, पण तू मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलेस. मला कधीही न संपणाऱ्या ट्रॅफिक जॅमपासून वाचवल्याबद्दल धन्यावद.”
यादरम्यान हेल्मेट न घातल्याने बिग बींना ट्रोल करण्यात आले. तथापि, फोटो पोस्ट केल्याच्या एका दिवसानंतर, अमिताभ यांनी स्पष्ट केले की, मुंबईच्या रस्त्यावर ऑन लॉकेशन शूटिंगच्या दरम्यानचा फोटो आहे. रविवार असल्याने रस्त्यावर शुक- शुकाट होता. मुंबईतील बालार्ड इस्टेट या परिसरातील रस्त्यावर आम्ही शूटिंगची परवानगी घेतली होती. कारण की, रविवारी त्या रस्त्यावरील अनेक ऑफिसेस बंद असतात आणि वाहतूक कोंडीसुद्धा नसल्याने आम्ही तिथे शूटिंग केली. मुख्य बाब म्हणजे, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आम्ही एक रोड बंद करण्याची पोलिसांंनी कारवाई देखील केली होती.
म्हणून इतकी खबरदारी घेत आम्ही त्या रस्त्यावर शूटिंग केली. सोबत आणखी एक, मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मागे गाडीवर बसलो नव्हतो, ती व्यक्ती चित्रपटाच्या शूटिंग मधील कास्ट अँड क्रु मधील होती. त्याच्या गाडीवर बसून मी सर्वांना सहज मी प्रवास करत होतो. मी त्यावेळी एका चित्रपटातील एक सीन शूट करत होतो, त्यामुळे मी कुठेही जात नव्हतो. पण मी सहज वाहतूक कोंडीला त्रासल्यामुळे आणि वेळेची बचत करायची असल्यामुळे ही खास सफर केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.