Bigg Boss OTT 2 Contestants List: बिग बॉस ओटीटीच्या नव्या पर्वात दिसणार हे सेलिब्रिटी; जिया शंकर, संभावना सेठ, पूनम पांडेसह अनेक नावांची चर्चा

Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी २' या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे.
Bigg Boss OTT 2 contestants list
Bigg Boss OTT 2 contestants listSaam TV

Contestants List Of Bigg Boss OTT 2: छोट्या पद्द्यावरील लोकप्रिय आणि कायम चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. बिग बॉस हा कायमचं प्रसिद्धीच्या झोतात असणारा शो आहे. कधी सदस्यांमुळे तर कधी सुत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम नेहमी चर्चेत असतो.

दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. सध्या 'बिग बॉस ओटीटी २' या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम १७ किंवा १८ जुनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्याता आहे. या वर्षी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खानवर आहे. या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सदस्यांची नावे आता समोर येऊ लागली आहेत.

बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वाचे सुत्रसंचालन करण जोहरने केले होते. त्यामुळे नवीन पर्वाचं सुत्रसंचालन कोण करणार यावर संभ्रम होता. पण आता या पर्वाचं सुत्रसंचालन सलमान खान करणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. (Latest Entertainment News)

Bigg Boss OTT 2 contestants list
Urfi Javed Jacket Goes Viral: उर्फीची दुसरी बाजू पहिल्यांदाच बघायला मिळाली; ड्रेस असा घातला की कौतुकाचा पाऊसच पडला!

या पर्वात एकूण १० सदस्य दिसणार आहे. कोणते सदस्य या पर्वात सहभागी होणार आहेत याची यादी पुढीलप्रमाणे...

संभावना सेठ

संभावना ही अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता संभावना आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

पुजा गौर

पुजा गौर ही अनेक मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.ती खतरों के खिलाडी ५ मध्ये झळकली होती.हि आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

अंजली अरोरा

लॉक अप शोच्या पहिल्या पर्वातून अंजली अरोरा प्रसिद्धीस आली आहे. हि आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

उमर रियाज

उमर रियाज हा त्याच्या चांगल्या दिसण्यामुळे लोकांच्या प्रसिद्धीस आला आहे. हा बिग बॉसच्या १५ मथ्ये दिसला हेता. यात तो सिद्धार्थ शुक्लाचा खास मित्र होता.हा आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

पूनम पांडे

पूनम पांडे ही अनेक रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आली आहे. ती लॉक अप आणि खतरों के खिलाडी या शोमूळे प्रसिद्ध झाली आहे.हि आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

आवेज दरबार

आवेज दरबार एक प्रसिद्ध सोशल मिडिया स्टार आहे. तो एक उत्तम नृत्यदिग्दर्शक आणि युट्युबर देखील आहे.हा आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

जिया शंकर

जिया शंकर ही एक उत्तम अभिनेत्री आहे. कॉंटेलाल आणि सन्स या मालिकेमधून तर वेड सारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.हि आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

फैझल शेख

मिस्टर फैझल या नावाने सोशल मिडियावर प्रचंड फेमस आहे. याआधी हा खतरों के खिलाडी १२ पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.हा आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

अनुराग दोभल

अनुराग हा एक प्रसिद्ध युट्युबर आहे. हा आता आपल्याला बिग बॉस ओटीटीच्या २ पर्वात दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com